• Mon. Nov 25th, 2024
    यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात, ठेवीदारांचे धाबे दणाणले

    सातारा: कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात निघाल्याचे आदेश सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिले आहेत. ही पतसंस्था अनेक दिवसांपासून आर्थिक व्यवहारामुळे चर्चेत होती. अखेर आज अवसायकाची नियुक्ती केली असून लेखापरीक्षक कमलेश पाचुपते यांच्याकडे अवसायानिकचा पदभार दिला आहे. पतसंस्था अवसायनात निघाल्याने ठेवीदारांचे धाबे दणाणले आहेत.
    राजू शेट्टी-उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा, शेट्टी सेनेच्या पाठिंब्यावर लढणार? मतदारसंघातील शिवसैनिकांत घालमेल
    मोहिते पतसंस्थेचे सातारा आणि सांगली जिल्हा कार्यक्षेत्र आहे. कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते पतसंस्थेचे संस्थापक आहेत. सातारा, सांगली जिल्ह्यात १४ शाखा आहेत. त्यांची सभासद संख्या १२ हजारांवर तर पतसंस्थेच्या ठेवी ३५ कोटींच्या आसपास आहेत. काही महिन्यांपासून पतसंस्थेच्या शाखेतून पैशांचा परतावा व ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळत नव्हत्या. त्यासाठी ठेवीदारांचे आंदोलन सुरू होते. या पतसंस्थेविरोधात ठेवीदारांनी दोन वेळा आंदोलनही केली होती. तसेच डॉ. मोहिते यांच्या घरावरही मोर्चा नेऊन आंदोलनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपनिबंधक कार्यालयानेही त्यांचे ऑडिट केले होते.

    उद्धव ठाकरेंची भेट, पण लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा नाही, राजू शेट्टींचा स्वबळाचा नारा कायम

    मात्र, त्यातील काही त्रुटी होत्या. त्याचा आर्थिक ताळमेळ लागत नव्हता. उपनिबंधक कार्यालयाने त्यांच्या कामकाजाचीही तपासणी केली होती. त्यात २०१९-२० ते २०२१-२२ या तीन वर्षांचे लेखापरीक्षणही झाले होते. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयाने संस्था अधिनियम १९६० च्या ८९ प्रमाणे संस्था अवसायनात घेण्याविषयी शिफारस केली होती. आई कॅन्सरमुळे आजारी आहे. तिचे ऑपरेशनही झाले आहे. तिला आजारपणातील औषध उपचारासाठी पैसे लागतात. मात्र या पतसंस्थेतून पैसे मिळत नाहीत. स्वतःचे पैसे असून सुद्धा आम्हाला काहीच करता येत नाही. पैशासाठी आंदोलने केली आहेत. पतसंस्था डबघाईला निघाल्याने आता आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असे ठेवीदार जयदीप मोहिते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *