• Sat. Jun 6th, 2026
    Pune News : आधी मोबाईल फॉरमॅट केला, नंतर आई घरात नसताना टोकाचं पाऊल; पुण्यात AIचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाने आयुष्य संपवलं

    Pimpri Chinchwad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पिंपरी-चिंचवडमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. AIचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाने आपलं आयुष्य संपवलं आहे.

    दिघी AIचं शिक्षण तरुणाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : पुण्यातून एक अत्यंत मोठी घटना समोर आली आहे. दिघी परिसरात AIचं शिक्षण घेत असलेल्या 19 वर्षीय अथर्व विजय देशमुख याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अथर्व देशमुख हा आईसोबत दिघीतील गंगोत्री हॉस्पिटलजवळ पार्वती भोजने यांच्या भाड्याच्या खोलीत राहत होता, तर त्याचे वडील विश्रांतवाडी परिसरात राहत होते. रविवारी 15 मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. आई बाहेर गेलेली असताना अथर्वने किचनमध्ये सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेतल्याची माहिती समोर आली आहे.

    सीट बेल्टने गळफास घेतला

    आई घरी परतल्यानंतर दरवाजा उघडत नसल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने खिडकीतून दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी समोर आलेले दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना तत्काळ दिघी पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी सीट बेल्ट कापून अथर्वला खाली उतरवलं आणि तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
    Maharashtra TimesAshok Kharat : बड्या नेत्यांचं भविष्य सांगणाऱ्या अशोक खरातला अटक, महिलेवर अत्याचाराचा आरोप, पेन ड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ

    मोबाईल पूर्णतः फॉरमॅट

    महत्त्वाची बाब म्हणजे, आत्महत्येपूर्वी अथर्वने आपला मोबाईल पूर्णतः फॉरमॅट केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून हे एक गूढ बनलं आहे. अथर्व वाघोलीतील नामांकित कॉलेजमध्ये AIचं शिक्षण घेत होता. त्याच्या अचानक जाण्याने आई ज्योती देशमुख आणि वडील यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दिघी पोलीस करत असून, आत्महत्येमागील कारण शोधण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
    Maharashtra TimesCrime News : कोणाला वाईट मेसेज गेले असल्यास माफ करा, इन्स्टावर स्टेटस, विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

    अल्पवयीन मतीमंद मुलीवर नातेवाईकांकडूनच अत्याचार

    विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात नात्यांना काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका सुरक्षित समजल्या जाणाऱ्या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन आणि मतिमंद मुलीवर तिच्याच तीन नातेवाईकांनी गेल्या सहा-सात महिन्यांपासून सामूहिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा