बीड: प्रभू श्रीरामाने अन्याया विरोधात लढा उभारला होता. आमच्यावर देखील गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झालाय. आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू श्री रामचंद्राने केंद्र व राज्य सरकारला द्यावी व मराठा आरक्षण जाहीर करावे, असे साकडे प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर जरांगेंनी घातले आहे. मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये त्यांचे सहकारी ऋषीकेश बेद्रे यांच्या नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हाच माझा आज नवीन वर्षाचा संकल्प असेल. मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणाअभावी बरबाद झाल्या आहेत. आता भावी पिढीसाठी प्रत्येकाने घराबाहेर पडायचे आहे, असे आवाहन करत आरक्षणाची ही लढाई निर्णायक असल्याचे सांगितले.

चंद्रकांत पाटलांना उत्तर…
चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य हे सुप्रीम कोर्टातील आरक्षणाबाबत असेल, आम्हाला आधीपासूनच आरक्षण आहे. आता पुरावे देखील सापडले आहेत, त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे पाटील यावेळी म्हणाले. त्याचबरोबर बीडमध्ये होत असलेल्या ओबीसींच्या सभेबाबत छगन भुजबळ यांच्या बाबत काय बोलावे? ते कामातून गेलेले आहेत. लोकशाहीत ज्याला त्याला सभा घ्यायचा अधिकार आहे, असे भुजबळांच्या होणाऱ्या सभेवरून जरांगे पाटील म्हणाले.