• Mon. Nov 25th, 2024
    नवीन कायद्याविरोधात ट्रक-डंपर चालकांचं रास्ता रोको आंदोलन, पोलिसांना मारहाण

    नवी मुंबई : केंद्र सरकारने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. ज्याच्याविरोधात बस, ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. हा कायदा ड्रायव्हरांच्या हिताचा नाही, असं वाहन चालकांचे म्हणणं आहे. तसेच नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर सोडल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा होणार आहे.

    मात्र, अपघात घडवून आणणाऱ्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होईल. या नवीन कायद्याच्या विरोधात नवी मुंबई मध्ये एनआरआय पोलीस ठाण्याच्या अंतर्गत JNPT रोड वर अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे. तेथील ड्रायव्हर लोकांनी रस्त्यांवर येऊन रास्ता रोको आंदोलन केलं. नवी मुंबईतील रेती बंदर येथे ४० ते ५० ट्रक चालकांनी रास्ता रोको केला. यावेळी या ट्रक चालकांनी पोलिसांवर लाठीचार्ज करत हाणामारी करण्याचा प्रयत्न केलेला पाहायला मिळत आहे.

    Share Market: वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात त्सुनामी! पडझडीनंतर सावरला अन् केला नवा विक्रम
    रास्ता रोको करणाऱ्यांना एनआरआय पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच उलवे येथील अशाच प्रकारचा रास्ता रोको सुरू आहे. त्यामुळे रेतीबंदर आणि उलवे रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याने कोणी प्रवास करत असाल तर सावधान कारण, उलवे साईडला गाडी फोडण्याचा इशारा ट्रक चालक आंदोलकांनी दिला आहे. सध्या अनेक ठिकाणी कडक पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला असून आता शांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. नवी मुंबई शहरात पुन्हा काही अघटित होऊ नये यासाठी जेएनपीटी, कलनबोली, उलवे येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे.
    मंत्रिपदाची इच्छा पूर्ण व्हावी, भरत गोगावले यांचं देवीकडे मागणं, शिवसेना-मनसे युतीवर मोठं भाष्य

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed