• Sat. Sep 21st, 2024
न्यू इयर सेलिब्रेशननंतर घरी परताना नियतीनं डाव साधला, गाडीची झाडाला धडक, युवतीचा मृत्यू तर…

सिंधुदुर्ग: कुडाळ येथून आपल्या मित्रांसोबत न्यू इयर सेलिब्रेशनसाठी सावंतवाडी येथे येऊन पहाटे परत निघत असताना मारुती सुझुकी गाडीची आंब्याच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात एका युवतीचा मृत्यू झाला. ऐश्वर्या महेश कवठणकर (२१, रा. पिंगुळी उत्कर्षनगर, ता. कुडाळ) असे तिचे नाव आहे. तर तिच्यासोबतचे दोन युवक जखमी झाले. कोलगाव येथील शैलू पै यांच्या हार्डवेअर शोरूमसमोर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.
आधी दुभाजकाला धडकली, मग झाडावर आदळली; कारचा भीषण अपघात, ६ मित्रांचा अंत, एक चूक भोवली
मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या ही तिचे मित्र सिद्धांत अशोक बांदेकर (रा. कुडाळ बाजारपेठ ता. कुडाळ) आणि साहील तेंडोलकर (रा. तेंडोली) यांच्या समवेत सिद्धांत बांदेकर याच्या मालकीच्या मारुती सुझुकी या गाडीत बसून त्यांचे सोबत न्यू इयर सेलिब्रेशनला गेली होती. पहाटे पाचच्या सुमारास कुडाळ येथे परतत असतात कोळगाव येथील शैलू पै यांच्या हार्डवेअर शोरूमच्या समोरील आंब्याच्या झाडाला समोरुन धडक बसली. या अपघातात गाडीच्या क्लीनर साईडला बसलेली ऐश्वर्या ही गंभीर जखमी झाली.

नववर्षानिमित्त भाविकांनी शेगाव फुललं, संत गजानन महाराजांच्या चरणी भक्त लीन

या अपघाताची माहिती समीर वाळके रा. कुडाळ यांनी ऐश्वर्याचे वडील महेश यांना देताच त्यांनी आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गाडीच्या बाहेर ऐश्वर्या ही बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. तसेच त्या गाडीच्या बाजुला सिद्धांत बांदेकर हा होता. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. तर दुसरा मित्र साहील तेंडोलकर यास गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर महेश यांनी रुग्णवाहिकेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे तिला उपचारार्थ हलविले. मात्र, उपचारापूर्वीच तिचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपघाताबाबतची फिर्याद ऐश्वर्याचे वडील महेश कवठणकर यांनी सावंतवाडी पोलिसात दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed