• Mon. Nov 25th, 2024
    मनोज सौनिक निवृत्त,  नितीन करीर राज्याचे नवे मुख्य सचिव, किती महिने कार्यभार सांभाळणार?

    मुंबई : राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या निवृत्तीनंतर नितीन करीर यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांनी ३० एप्रिल ते ३१ डिसेंबर या कालावधी दरम्यान राज्याचं मुख्य सचिवपद भूषवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौनिक यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते अशा चर्चा होत्या. मात्र, आता नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्यानं इतर चर्चा थांबल्या आहेत. नितीन करीर यांची मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळात करण्यात येणार आहे.

    नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी निवड करण्यात आली असली तरी त्यांच्याकडे पुढील तीन महिन्यांचा कालावधी असेल. नितीन करीर हे ३१ मार्च २०२४ रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांना संधी मिळू शकते.

    नितीन करीर यांच्या नावासाठी राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्य आग्रही असल्याची चर्चा होती. काही मंत्र्यांनी नितीन करीर यांना मुख्य सचिव पदासाठी संधी दिली जावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
    चिनी लष्करात खळबळ; अण्वस्त्रांची देखभाल करणाऱ्या रॉकेट फोर्सचे ३ टॉप कमांडर बडतर्फ
    राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती झाली आहे. करीर हे १९९८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते वित्त विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. आता मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. नितीन करीर हे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून साडे पाच वाजता पदभार स्वीकारतील. नितीन करीर यांची सेवानिवृत्ती ३१ मार्चला असल्यानं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन करीर यांना पुढे तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाऊ शकते.

    कर्ज झाल्याने लढवली शक्कल; दरोड्याचा बनाव करणारा फिर्यादीच निघाला चोर, असं फुटलं बिंग
    सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे आज निवृत्त होत आहेत. त्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पत्र व्यवहार केला होता. मात्र, केंद्रानं त्या प्रस्तावाला मंजूर न केल्यानं नितीन करीर यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांनी यापूर्वी महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागात काम केलेलं आहे. ते सध्या वित्त विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.
    ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; दारु, अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्तRead Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed