• Sat. Sep 21st, 2024
जुन्नरच्या राजकारणात होणार भूकंप! सत्यशील शेरकरांच्या वाढदिवशी शरद पवार देणार गिफ्ट

पुणे : काही महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने मोठा भूकंप झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यात जुन्नर तालुक्यातील राजकारणात आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. मात्र आता जुन्नर तालुक्यातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उमेदवारी जाहीर करून गिफ्ट देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

येत्या १२ जानेवारीला विघ्नहर साखर कारखाना येथे इथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे येणार आहेत. या कार्यक्रम दिवशीच सत्यशील शेरकर यांचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे याच दिवशी शरद पवार हे सत्यशील शेरकर यांना शरद पवार वाढदिवसाचे गिफ्ट देतात का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

मराठा आरक्षणमुळे हा इथेनॉल विस्तारीकरण प्रकल्प कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. मात्र आता १२ जानेवारी रोजी हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यावेळी शरद पवार येणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेत तालुक्याच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले असल्याचे पहायला मिळत आहे. माझ्या कोणत्याही भूमिकेमुळे जुन्नर राष्ट्रवादीत फूट पडणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त देखील केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या जुन्नरच्या एंट्रीने राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे.

जुन्नरमध्ये शरद पवारांची पुन्हा एन्ट्री होणार, सत्यशील शेरकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

याबाबत सत्यशील शेरकर यांनी “मटा ऑनलाईन” बोलताना सांगितले की, मराठा आरक्षणामुळे इथेनॉल विस्तारीकरण प्रकल्प आणि अन्य कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. मात्र १२ जानेवारीला हा कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवार साहेब येणार आहे. मात्र माझ्या उमेदवारी बाबत अद्याप तरी माझ्यापर्यंत कोणतीही माहिती आलेली नसल्याचे शेरकर यांनी सांगितले.

सत्यशील शेरकर यांना त्यांच्या वाढदिवशी उमेदवारी जाहीर करण्याची राजकीय खेळी शरद पवार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जुन्नरच्या राजकारणात काही दिवसात मोठ्या घडामोडी पहायला मिळू शकतात यात काही शंका नाही.

पवारांना जुन्नरमध्ये मिळणार नवा शिलेदार, काँग्रेस नेत्याच्या लेकाला उमेदवारी मिळण्याची चर्चा

अमोल कोल्हे – सत्यशील शेरकर यांची जवळीक

खासदार अमोल कोल्हे यांनी काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चात सत्यशील शेरकर यांचा मोठा सहभाग होता. त्यामुळे सत्यशील शेरकर आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची वाढती जवळीक पाहता राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे येत्या १२ तारखेला शरद पवार हे काय भूमिका घेतात याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed