• Sat. Sep 21st, 2024
जोडप्याचं २० दिवसांपूर्वी लग्न; प्रबळगडावर फिरण्यास गेले, सेल्फीच्या मोहामुळे संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला

रायगड: गडावर ट्रेकिंगला गेल्यावर फोटो आणि सेल्फी काढताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा एक किरकोळ चूकही आपल्या जीवावर बेतू शकते. असाच प्रकार रायगड जिल्ह्यात पनवेनजवळ असलेल्या माची प्रबळगडावर घडला आहे. एका महिलेचा सेल्फी काढताना पाय घसरून तोल गेल्याने मृत्यू झाला आहे.
कात्रज बोगद्यात मोठा अपघात; ६ गाड्या एकमेकांवर आदळल्या, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २८ डिसेंबर रोजी घडली असून शुभांगी विनायक पटेल (दत्तवाडी, पुणे ) या मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे. दोघे पती पत्नी ट्रेकिंग करण्यासाठी आले होते. शुभांगी आणि विनायक यांचे २० दिवसांपूर्वी लग्न झाले होते. यावेळी शुभांगी सेल्फी काढताना त्याचा पाय घसरून ती पतीच्या डोळ्यादेखत खाली दरीत कोसळली. शुभांगी ही अंदाजे दीड ते दोन हजार फूट खोल दरीत कोसळल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. शुभांगी आणि तिचा पती विनायक पटेल हे दोघे लोणावळा येथे हनिमूनसाठी २८ डिसेंबर रोजी गेले होते. त्या ठिकाणाहून ते दुपारी २ च्या सुमारास माची प्रबळगड येथे ट्रेकिंगसाठी गेले होते.

कोल्हापुरातील ऊस रोपवाटिकांमधील नवीन व वैविध्यपूर्ण वाणांच्या रोपांना राज्यात मोठी मागणी

या घटनेचे वृत्त कळताच पोलीस आणि काही स्थानिक निसर्ग मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलीस ठाण्याचे वपोनी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेडुंग चौकीचे पोलीस अंमलदार गोपीनाथ पठारे, अमर भालसिंग तसेच एपीआय अर्चना कुदळे, एपीआय सचिन पोवार, पीएसआय हर्षल रजपूत, सोनकांबळे आदी पोलिसांच्या, स्थानिकांच्या तसेच निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. यावेळी फायर ब्रिगेडलाही पाचारण करण्यात आले होते. या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद पनवेल पोलीस ठाण्यात काढलेले असून अधिक तपास पनवेल ग्रामीण पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed