• Sat. Sep 21st, 2024

राहुल गांधींचा भाजप आणि RSS वर हल्लाबोल; देशाला गुलामगिरीकडे नेत असल्याचा आरोप

राहुल गांधींचा भाजप आणि RSS वर हल्लाबोल; देशाला गुलामगिरीकडे नेत असल्याचा आरोप

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) देशाला गुलामगिरीकडे घेऊन जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राहुल म्हणाले, “देशातील सर्व प्रमुख संस्था संघाने काबीज केल्या आहेत. सर्व विद्यापीठे कुलगुरू याच संघटनेशी संबंधित आहेत.” यासोबतच राहुल गांधी म्हणाले की, आता कुलगुरूंची निवड एखाद्या संस्थेतून केली जाते.

देशात दोन विचारधारांची लढाई

राहुल गांधी म्हणाले, “देशात दोन विचारसरणींमध्ये लढा सुरू आहे. लोकांना वाटते की ही राजकीय लढाई आहे, सत्तेसाठीची लढाई आहे. “भाजप देशात राजेशाही परत आणत आहे. भाजपमध्ये एकच व्यक्ती राज्य करतो. जसे पूर्वी राजा आदेश देत असे आणि सर्वांना पाळावे लागत होते. तिथेही तेच होत आहे. तर काँग्रेसचा आवाज हा खालून येतो. कार्यकर्ता म्हणतो आणि नेता ऐकतो.”

इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर तरुणाईचा वेळ वाया जात आहे

देशातील बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या काळात देशात ४० वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी आहे. लोकांकडे, तरुणांकडे नोकऱ्या नाहीत. ते फक्त फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आपला वेळ वाया घालवत उद्ध्वस्त होत आहे.” देशातील तरुणांना नोकरीची गरज आहे. त्यांनी सोशल मीडियावर बसू नये.” यावेळी राहुल यांनी अग्निवीर योजनेबाबत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.
प्रेमाची दुकान उघडत असाल तर तुम्ही काँग्रेसी आहात

राहुल गांधी म्हणाले, “भारत जोडोच्या निमित्ताने आम्ही कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चाललो. चार हजार किलोमीटरचा प्रवास केला. द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान उघडले. द्वेषाच्या बाजारात प्रेमाची दुकान उघडत असाल तर तुम्ही काँग्रेसी आहात. महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगायचे आहे की, तुम्ही खास आहात. मी भारत जोडो यात्रेत फिरत होतो. तेव्हा महाराष्ट्रात येताच लक्षात आले की ही काँग्रेसची भूमी आहे. राहुल गांधी म्हणाले, इथल्या लोकांना काँग्रेसची विचारधारा न सांगता समजते.

राहूल गांधी म्हणाले, “जेव्हा आमचा लढा सुरू झाला तेव्हा तो महाराष्ट्रातून होता. त्यामुळेच आम्ही नागपुरात आलो आहोत. तुम्ही वाघ आहात. तुम्ही कोणाला घाबरू नका. तुमच्या मनाची लढाई ही तुमच्या विचारसरणीची लढाई आहे. तुम्ही आणि मी मिळून महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत जिंकू असा विश्वास राहूल गांधी यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed