• Thu. Nov 28th, 2024

    ऑनलाईन भामटेगिरीचा भाजपच्या माजी आमदाराला फटका; फेसबुकवर फेक अकाउंट, अनेकांकडे पैशांची मागणी

    ऑनलाईन भामटेगिरीचा भाजपच्या माजी आमदाराला फटका; फेसबुकवर फेक अकाउंट, अनेकांकडे पैशांची मागणी

    बुलढाणा: कुणाचे ना कुणाचे फेक अकाउंट काढून त्यांच्या नावाने पैसे मागण्याचा प्रकार दर दिवशी कुठे ना कुठे उघडकीस येत आहे. याबाबत नेटीझन्स कमालीचे सतर्क झालेले आहेत. परंतु नव्याने सोशल मीडिया जॉईन करणारे फसवणुकीच्या चक्रात अडकतात. या ऑनलाईन भामटेगिरीचा फटका भाजपचे नेते तसेच माजी आमदार विजयराज शिंदे यांना सुद्धा बसला. शिंदे यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाले असून हॅकरकडून काहींकडे पैशांची मागणी केली जात आहे.
    पुण्यात दोन दिवस वाहतुकीत बदल, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन, वाचा सविस्तर…
    व्हाट्सअपवर सुद्धा या फेसबुकच्या फेक अकाउंटचा गैरवापर करण्याचा प्रयत्न झाला आहे. यासंदर्भात कुणीही काहीही व्यवहार करू नये, संबंधीत प्रकरणाची सायबर पोलिसांना सूचना देण्यात आल्याची माहिती विजयराज शिंदे यांनी दिली आहे. आज दुपारपासून विजयराज शिंदे यांच्या नावाने फेक अकाउंट तयार करण्यात आले असून या अकाउंटवरून काहींना मॅसेज पाठविण्यात आले आहेत. फेक अकाउंट करणार्‍याने विजयराज शिंदे यांच्या नावाचा वापर इतरांना फसविण्यासाठीही केला असल्याचे समोर येत आहे.

    महारॅलीत खुर्च्यांवर ‘हैं तैयार हम’ क्यूआर कोड, काँग्रेसचे ‘डोनेशन फॉर देश’ अभियान

    ‘मी सीआरपीएफ सुमित कुमार असून घर सोडून जात आहेत. बदली झाल्यामुळे आता घरातील वस्तू सोबत नेण्यापेक्षा विकत असल्याचे सांगून काही फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविले. त्यात बुलेट, फर्नीचर, कपाट, फ्रीज यांची किंमत केवळ ९५ हजार सांगण्यात आली आहे. तुम्हाला खोटं वाटेल परंतु मध्यस्थी म्हणून विजयराज शिंदे असल्याचेही या ऑनलाईन भामट्याने काही जणांसोबत चॅटींग केली. अ‍ॅड. विक्रांत मारोडकर आणि प्रकाश देशलहरा त्यातीलच एक होते. अ‍ॅड. मारोडकर यांच्या सदर बाब लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर फेक अकाऊंटचा प्रकार समोर आला. विजयराज शिंदे म्हणून कुणी जर व्यवहाराच्या बाबतीत चॅटींग केली असेल तर तत्काळ मोबाईलवर संपर्क करावा, असे आवाहन विजयराज शिंदे यांनी जनतेला केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed