मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात सध्या वाकयुद्ध सुरू आहे. जरांगे पाटील आणि भुजबळ यांना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे भुजबळांनीही सबुरी घेतली आहे.
छगन भुजबळ म्हणाले…
– जरांगे पाटील यांनी मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे, लोकशाहीत सर्वांना हक्क
– महायुतीतील जागा वाटपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेली भूमिका योग्यच
– निवडणुका आल्या की आव्हान आणि प्रतिआव्हान दिले जाते असे सांगत अमोल कोल्हे आणि अजित पवार यांच्यावर बोलणे टाळले
– नाशिकमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा दावा
– येवल्यातील काळे झेंडे दाखविण्याच्या प्रकरणात दोन पत्रकारांचाही समावेश असल्याचा आरोप
– २३ जानेवारीला नाशिकमध्ये होत असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या महाअधिवेशनावरही बोलणे टाळले
‘माझ्यामागे असंख्य नागरिक’
मंत्रिमंडळात भुजबळ यांचे ऐकले जात नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ‘मी एकटा पडलो नसून माझ्यामागे असंख्य नागरिक आहेत. राज्यातील काही आमदारसुद्धा माझ्यासोबत आहेत; परंतु ते सध्या बोलत नाहीत,’ असे सांगून आपल्याला एकट्याला लढाईची सवय असल्याचा दावाही भुजबळ यांनी केला. मागासवर्ग आयोग स्वतंत्रपणे काम करीत असल्याचे सांगून यावरही अधिक भाष्य करणे भुजबळांनी टाळले.