• Sat. Sep 21st, 2024
अमोल कोल्हेंवर दादा ब्रिगेडचा हल्ला, काल गळ्यात गळे, आज आव्हानाची भाषा, अण्णांनी दंड थोपटले

मावळ, पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याबद्दल आणि त्यांनी केलेल्या विकास कामाबद्दल वक्तव्य केले होते. त्यावर आता मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अगोदर गळ्यात गळे घातले, त्यानंतर अजित पवार यांच्या वक्तव्याला पाठिंबा देण्यासाठी सुनील शेळके यांनी दंड थोपटले आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी गेल्या साडेचार वर्षांमध्ये त्यांच्या मतदार संघातील नागरिकांच्या कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या. कोणकोणत्या गावात ते गेले, ते नागरिकांना भेटले, किती नागरिकांच्या समस्या सोडवल्या, याचा लेखाजोखा घ्यावा आणि मगच दादांच्या वक्तव्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करावा, अशी प्रतिक्रिया सुनील शेळके यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट पडले. त्यात अजित पवार यांनी आता लोकसभेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्यात शिरूर लोकसभे संदर्भात त्यांनी खासदारांबाबत वक्तव्य केले आहे.

पार्थ पवारांचं काय चाललंय? अजितदादांचं मावळ लोकसभेवर विशेष लक्ष, लेकाच्या मात्र दांड्या सुरुच
यावर सुनील शेळके म्हणाले की, दादांनी जे काही वक्तव्य केले आहे, ते गेली तीस ते पस्तीस वर्ष दादांचे पुण्याच्या राजकारणात आणि जडघडणीत जे योगदान आहे, आणि ज्या ठिकाणी दादा शब्द देत आहेत तो देखील जनतेच्या विश्वासावर आणि त्यांच्या ताकदीवर देण्याचे काम आजपर्यंत दादांनी केलेले आहे. शेवटी ३० ते ३५ वर्ष जनतेची १६ -१६, १८-१८ तास काम करून पुणे जिल्ह्यात जे विकासाचं काम केले आहे त्याच जोरावर दादांचे हे वक्तव्य आहे. म्हणून मला शिरूर लोकसभेबाबत सांगत असताना डॉ. अमोल कोल्हे यांच्या बाबतीत जे दादांनी वक्तव्य केले त्यावर कोल्हे यांनी साडेचार वर्षाच्या काळात यांनी देखील शिरूर मधल्या किती गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना भेट दिली. आणि त्या भागातले किती प्रश्न सोडवले याचा लेखाजोखा त्यांनी मांडावा, त्यानंतर दादांनी केलेल्या वक्तव्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करावा.

अजितदादांचा कट्टर समर्थक ठाकरेंच्या भेटीला, मावळमध्ये शह बसणार? वाचा ग्राऊण्ड रिपोर्ट

मावळ लोकसभेबाबत बोलताना शेळके यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात मावळ लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला असेल आणि तो निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार असल्याचे शेळके म्हणाले आहेत.

अमोल कोल्हेंवर प्रश्न, अजितदादा संतापले

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed