• Sat. Sep 21st, 2024

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयांमधून केले पलायन; जिल्ह्यात आढळले ३ रुग्ण

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयांमधून केले पलायन; जिल्ह्यात आढळले ३ रुग्ण

हिंगोली : हिंगोली जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना संसर्गजन्य रोगाचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामधील एक जण ग्रह विलगीकरणांमध्ये ठेवण्यात आला असल्याने यावर कोविड वार्डमध्ये उपचार केले जात असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे.

शासकीय रुग्णालयात सर्दी,खोकला घश्याचा त्रास होत असलेल्या दोन रुग्णांना (२५ डिसेंबर)सोमवार रोजी दाखल केले होते. डॉक्टरांकडून आरटीपीसीआर चाचणी केल्यानंतर दोन्ही रुग्ण कोरोना बाधित असल्याचे या तपासणीमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने या रुग्णाला कोविड वार्ड मध्ये उपचारासाठी दाखल करून घेतले व एक जण ग्रह विलगीकरणांमध्ये ठेवण्यात आला आहे. आता या दोन्ही रुग्णांच्या नातेवाईक आई वडिलांचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी एक रुग्ण रुग्णालयात दाखल झाला होता, त्याचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी रुग्णालयांमधून पलायन केले असल्याचे देखील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.यावर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मार्फत उपचार केले जाणार असल्याचे आता सांगण्यात आले आहे. कोविड पॉझिटिव्ह असलेला एक जण रुग्ण हा पुणे या ठिकाणावरून आलेला होता, तर दुसरा रुग्ण बाहेरगावी आल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे.

या रुग्णांचे नमुने जीनोम अधिक तपासणीसाठी दिल्ली व नागपूर प्रयोगशाळेत पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाचा नवीन व्हॅरिंएट आहे का ? याची माहिती जिनोम सिक्वेंसिंग तपासणीनंतर सांगण्यात येईल असे प्रशासन सूत्रांनी सांगितले आहे.

यामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच सामाजिक अंतर पाळावे, गर्दीमध्ये मास्कचा वापर करावा, सर्दी व श्वसनाचे लक्षणे दिसून आल्यास वेळीच आरटीपीसीआर चाचणी करावी, असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed