• Mon. Nov 25th, 2024
    आरबीआयसह ११ ठिकाणं बॉम्बनं उडवून देऊ, ईमेलवरुन धमकी, आणखी दोन बँकांची नावं

    मुंबई : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एक धमकीचा ईमेल आला आहे. यामध्ये मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. हा ईमेल खिलापत इंडिया या नावाच्या मेल आयडीवरुन आला आहे.

    धमकी देणाऱ्यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, इतर बँकांचे अधिकारी आणि काही नामांकित मंत्र्यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. आमच्याकडे यासाठी पुरावे आहेत, असं म्हटलं आहे.

    धमकी देणाऱ्यांनी ११ ठिकाणांपैकी काही ठिकाणांची नावं सांगितली आहेत. त्यामध्ये आरबीआय- नवीन मध्यवर्ती कार्यालय इमारत, फोर्ट, मुंबई, एचडीएफसी हाऊस, चर्चगेट, आयसीआयसीआयसी बँक, बीकेसी मुंबई या ठिकाणांचा त्यामध्ये समावेशी आहे.

    कसब्याचं मैदान गाजवल्यानंतर लोकसभेबाबत रवींद्र धंगेकरांचं मोठं वक्तव्य, बावनकुळेंच्या घोषणेवर म्हणाले…
    धमकी देणाऱ्यांनी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तातडीनं राजीनामा द्यावा. आणि घोटाळा उघड करणार प्रसिद्धीपत्रक माध्यमांना द्यावं अशी मागणी धमकी देणाऱ्यांनी केली आहे. घोटाळ्यासाठी सरकारनं दोघांना आणि इतर जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा करावी, अशी मागणी धमकी देणाऱ्यांनी केली होती.
    पुणे लोकसभेच्या उमेदवारीसाठी सुनील देवधर ॲक्शन मोडवर, शक्तिप्रदर्शनासाठी कार्यक्रमांचा सपाटा
    आमच्या मागण्या मान्य न केल्यास ११ ठिकाणी एका पाठोपाठ स्फोट करु अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. धमकी देणाऱ्यांनी दुपारी दीडची डेडलाइन दिली होती.

    धमकीच्या ई मेल प्रकरणी एमआरए पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे. धमकीचा मेल मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली.

    रिझर्व्ह बँकेला सकाळी साधारण १०.५० वाजता धमकीचा ईमेल आला… त्यानंतर इमारत रिक्त करण्यात आली होती. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कर्मचाऱ्यांना बाहेरच थांबवण्यात आले होते. बॉम्बशोधक पथक येऊन तपासणी केल्यानंतर अफवा असल्याचे निश्चित झाल्यावर कर्मचाऱ्यांना ३ वाजता इमारतीत प्रवेश देण्यात आला, अशी माहिती आरबीआयमधील एका कर्मचाऱ्याने दिली…

    दरम्यान, या प्रकारानंतर संबंधित ठिकाणांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. मुंबईतील इतर ठिकाणं उडवण्याबाबत धमकीचे फोन देखील यापूर्वी येऊन गेलेले आहेत.
    ठाकरेंना अयोध्येतील राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण का दिले नाही? महाजन म्हणाले, फक्त VVIP लोकांनाच….
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed