असे असतानाच दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तर आज पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देऊन कोल्हेंचा पराभव करणारच असा प्रण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवला. या सर्व घडामोडींबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुळे आज इंदापूर दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आम्ही सत्तेत असताना असले उद्योग केले नाहीत
सुळे म्हणाल्या की, ही लोकशाही आहे. दडपशाही दिल्लीवाले करतात. विरोधात बोलला की संसदेतून बाहेर काढा. ईडी-सीबीआय-इन्कम टॅक्सची भीती दाखवा. ही भ्रष्ट जुमला पार्टीची पद्धत आहे. आमच्यासाठी ही लोकशाही आहे. त्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आम्ही सत्तेत असताना कोणावर असले उद्योग व सुडाचे राजकारण केले नाही आणि कधी करणार ही नाही, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला.
मी मेरिटवर तिकीट मागितले आहे
मी जयंत पाटील यांच्याकडे तिकीट मिळावं यासाठी मागणी केली आहे. तुम्ही शरद पवारांना उभं करून माझं तिकीट कापताय काय ? मी मेरिटवर तिकीट मागितले आहे. सुप्रिया सुळे यांची सगळ्यात मोठी ताकद ही सुप्रिया सुळे यांची इमानदारी आहे, असंही त्या म्हणाल्या.