• Mon. Nov 25th, 2024
    Dhananjay Munde: धनंजय मुंडे तिसऱ्यांदा करोनाबाधित, ट्वीट करत दिली माहिती, चार दिवसांपासून…

    बीड : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. नागपूर अधिवेशनानंतर अस्वस्थ वाटत असल्याने तपासणी केली असता करोनाबाधित असल्याचं डॉक्टरांनी माहिती दिल्यानंतर ते सध्या चार दिवसापासून क्वारंटाईन आहेत. धनंजय मुंडेंना तिसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे.

    देशात पुन्हा एकदा करोनाने शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे. यात हळुवारपणे पेशंट वाढताना पाहायला मिळत आहेत. यात सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना देखील अस्वस्थ वाटत असल्याने नागपूर अधिवेशनानंतर त्यांनी तपासणी केली असता करोनाबाधित असल्याचं तपासणीअंती पुढे आल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. यामुळे ते गेल्या चार दिवसापासून क्वारंटाईन आहे.
    मनोज जरांगे पाटलांचा अण्णा हजारे झालेला नाही, डॉ. कुमार सप्तर्षी यांचा उपरोधिक टोला
    त्याचप्रमाणे ”लवकरच जनतेच्या सेवेत पुन्हा एकदा हजर होणार”, असल्याचं देखील त्यांनी ट्वीट करत सांगितलं आहे. मात्र, यावेळेस जनतेलाही या रोगापासून सावध राहण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. काही वर्षांपूर्वी याच रोगाने थैमान घालत राज्य नव्हे तर अनेक मोठ्या देशांना हैरणा केलं होतं. मात्र, हळुवारपणे का होईना या रोगावर नियंत्रण आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं होतं.

    मात्र, पुन्हा एकदा आता या रोगाने शिरकाव करत अनेक राज्यात तोंड वर काढायला सुरुवात केली आहे. त्याचदरम्या, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना देखील या रोगाची लागण झाली आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यावर उपचार सुरू असून गेल्या चार दिवसापासून धनंजय मुंडे हे क्वारंटाईन आहेत, यातून बाहेर पडल्यानंतर लवकरच जनतेच्या सेवेत येणार असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. मात्र, नागरिकांनी सध्या थंडीचे दिवस असल्याने या रोगाची लागण लवकरात लवकर होते यासाठी काळजी घेण्याचं आवाहन देखील यावेळेस धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
    विराट कोहलीचा द. आफ्रिकेविरुद्ध खास प्लॅन, स्पेशल-18 सराव सत्र नेमकं काय आहे; जाणून घ्या

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed