• Sat. Sep 21st, 2024
कॉलेजमधील तरुण-तरुणी दुचाकीवरून निघाले; अचानक टेम्पोची जोरदार धडक, दोघांचा जागीच मृत्यू

सातारा: त्रिमली – घाटमाथा रस्त्यावर छोटा हत्ती टेम्पो आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात स्कुटीवरील युवक आणि युवती जागेवरच ठार झाले. सानिया रामचंद्र भोसले (२१, रा. खोतवाडी, ता. मिरज जि. सांगली) आणि निखिल उत्तम तिकुटे (२०, रा. माळशिरस) असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान या प्रकरणी छोटा हत्ती चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक चळवळीचा खंबीर पाठीराखा हरपला; ॲड. मनोहरराव गोमारे कालवश, नेते मंडळींकडून शोक व्यक्त
मिळालेल्या माहितीनुसार, त्रिमली (ता. खटाव) गावचे हद्दीत दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुसेसावळीकडून घाटमाथ्याकडे निघालेला छोटा हत्ती आणि घाटमाथ्याकडून पुसेसावळी कडेगावकडे निघालेली स्कुटी यांची जोरदार धडक झाली. या धडकेत स्कुटीवरील सानिया रामचंद्र भोसले आणि निखिल उत्तम तिकुटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी छोटा हत्तीचालक सतीश मारुती भगत (रा. सातारा, मुळगाव पिंपरद, ता. फलटण) याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं कुटुंब आपली जबाबदारी, सगळी कंत्राटं सोयऱ्यांच्या घरी ; शिंदेंकडून ठाकरेंवर आरोपांच्या फैरी

अपघातात ठार झालेले तरुण आणि तरुणी कडेगाव येथील महाविद्यालयत शिक्षण घेत असल्याचे समजते. निखिल तिकुटे याचे वडील माण तालुक्यात कृषी विभागात कामाला आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रात्री उशिरा औंध ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed