• Mon. Nov 25th, 2024
    आमदार अपात्रता सुनावणीत शिंदे गटाचा युक्तिवाद म्हणजे नो बॉल, डेड बॉल, ठाकरे गटाचा युक्तिवाद

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: एखादा दुसरा सरळ बॉल वगळता एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमदारांच्या अपात्रता सुनावणीत केलेला युक्तिवाद म्हणजे नो बॉल, डेड बॉल आणि वाईड वॉलचे मिश्रण आहे, असा टोला ठाकरे गटाच्या वकिलांनी लगावला. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरील सुनावणीमध्ये बुधवारी दोन्ही पक्षांनी आपला युक्तिवाद पूर्ण केला. विधानसभा अध्यक्ष यांनी या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे.

    ठाकरे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांपैकी बहुतांश कागदपत्रे खोटी असल्याचा दावा व युक्तिवाद शिंदे गटाचे वकील वरिष्ठ अधिवक्ता महेश जेठमलानी यांनी केला. याला प्रत्युत्तर देताना वरिष्ठ अधिवक्ता देवदत्त कामत यांनी शिंदे गटाचा युक्तिवाद म्हणजे त्यांनी केलेल्या कृत्यांचे लंगडे समर्थन (लेम डक आर्ग्युमेंट) असल्याचा टोला कामत यांनी यावेळी लगावला.
    शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने, सरकारचा धिक्कार असो; महाविकास आघाडीची विधानभवन परिसरात घोषणाबाजी

    ठाकरे गटाने खोटी कागदपत्रे दाखल केल्याचा दावा खोडून काढताना सर्वोच्च न्यायालयात आपण अतिरिक्त शपथपत्रसुद्धा दाखल केल्याचे नमूद केले. शिंदेंचे गटनेते पद रद्द करण्याचा राष्ट्रीय कार्यकारिणीतील ठरावाचा सर्वोच्च न्यायालयात सादर केलेला व या सुनावणीत सादर केलेला कागद हा एकच असल्याचा दावा केला.
    जाणीव पूर्वक नागपूरला बदनाम करण्याचा प्रकार; विरोधकांना एनसीआरबीचा अहवालच वाचता येत नाही- फडणवीस

    प्रथमदर्शनीवर भर

    विधानसभा अध्यक्षांनी ही सुनावणी घेताना प्रथमदर्शनी (प्रायमा फेसी) स्थितीवर निर्णय द्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. पक्षांतर बंदी कायदा करताना अनुच्छेद १०मध्ये करण्यात आलेल्या तरतुदींनुसार या अनुच्छेदाला भारतीय साक्षीपुरावा कायदा (एव्हिडन्स अॅक्ट) लागू होत नाही, असा दावा कामत यांनी केला. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सहा निर्णयांचे दाखलेलसुद्धा दिले. तरीसुद्धा शिंदे गट हा आग्रह करीत करून ही सर्वोच्च न्यायलयाची थट्टा असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.
    रस्ते बनविणाऱ्या कंपनीला ऑक्सिजन प्लान्टचे काम, २७० कोटींची ५७ कंत्राट देऊन खिसे भरल्यात आले: मुख्यमंत्री शिंदे

    विषय पूर्ण माहीत नसणाऱ्यांना मी उत्तर देत नाही, उद्धव ठाकरेंचा बंधू राज यांना टोला

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed