• Sun. Sep 22nd, 2024

जालना-मुंबई ‘वंदे भारत’बाबत मोठी अपडेट, या तारखेपासून सुरु होण्याची शक्यता, कसे असेल नियोजन?

जालना-मुंबई ‘वंदे भारत’बाबत मोठी अपडेट, या तारखेपासून सुरु होण्याची शक्यता, कसे असेल नियोजन?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : देशभरात आपलया वेगामुळे गाजत असलेल्या वंदे भारत रेल्वे लवकरच मराठवाड्यातून धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वे विभागाला वंदे भारतचे नुकतेच रॅक मिळाले आहे. हे रॅक मराठवाड्यात चालविण्याबाबत विचार सुरू असून, जालना ते मनमाड दरम्यान ही रेल्वे सुरू केली जाणार असल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. ही रेल्वे आगामी आठवडयात घोषित होण्याचीही शक्यता रेल्वेच्या काही सूत्रांनी व्यक्त केली आहे.

वंदे भारत रेल्वे लवकरच चालविण्यात येणार असल्याचे सुतोवाच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचयाकडून देण्यात आले होते. मध्य रेल्वेला एक वंदे भारत रेल्वेची रॅक देण्यात आली असल्याची माहितीही समोर आली. या पुर्वी सदर रेल्वे जालना ते मुंबई दरम्यान चालविण्याचा प्रस्तावही देण्यात आला होता. सदर रेल्वेसाठी नांदेड विभागाने जालना ते अंकाई दरम्यान रेल्वे रूळाच्या कामाचेही वेगात सुरू असून पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

दरम्यान, आगामी आठवड्यापासून वंदेभारत ही रेल्वे धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही रेल्वे सकाळी ५.३० वाजेच्या दरम्यान जालनाहून निघणार आहे. ही रेल्वे सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणार आहे. ही दुपारी १.३० वाजता मुंबईहून निघणार आहे. ही रेल्वे सायंकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान जालना येथे पोहोचणार आहे. असा अंदाजे वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. या रेल्वेचे उद्घाटनही पुढील आठवड्यात केली जाणार असून, यासाठी वंदे भारतची पहिली फेरी ही विशेष उद्घाटन रेल्वे म्हणून चालविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशीही माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसला ग्रीन सिग्नल; कधीपासून सुरु होणार सेवा? वाचा अपडेट
सोळा डब्ब्यांची रेल्वे

वंदे भारत रेल्वेचे गेल्या आठवड्यात वितरण करण्यात आले आहे. सोळा डब्ब्यांची वंदे भारत रेल्वे जालना ते मुंबई या दरम्यान धावणार आहे. ही रेल्वे सकाळच्या सत्रात चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या देखभाल-दुरुस्ती मुंबईत

जालना रेल्वे स्टेशन येथे पीटलाइनच्या काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत वंदे भारत रेल्वेचे देखभाल-दुरुस्तीचे काम मुंबईला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशीही माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed