• Mon. Nov 25th, 2024
    धमकी देऊन तिघांचा आळीपाळीने अत्याचार, बायकोने नवऱ्याला हकीकत सांगताच पायाखालची जमीन सरकली

    हिंगोली : हिंगोली तालुक्यामधील मौजे चोरजवळ येथील विवाहित महिलेवर तिघा जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यामध्ये हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये काल १८ डिसेंबर रोजी सोमवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली तालुक्यातील चोरजवळा गावामध्ये एका विवाहित महिलेचा पती कामानिमित्ताने शेतात गेला असताना २६ ऑगस्ट रोजीच्या रात्रीच्या सुमारास गावातीलच असलेल्या लक्ष्मण रामेश्वर पठाडे यांनी या महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला.

    महिलेच्या पती संबंधात विचारपूस केली आणि ”तुझ्या पतीचे इतर दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचे सांगितले. याबाबत तुला त्याचा पुरावा देखील देतो”, असे म्हणून या महिलेवर अत्याचार केला आणि आठ दिवसांनी परत महिलेवर घरी येऊन अत्याचार केला. सदरील घटना कुणालाही सांगितल्यास ”तुला जीवे मारीन” अशा पद्धतीची धमकी या महिलेला दिली. या घटनेमुळे महिला चांगलीच घाबरली.

    चलनी नोटांवर फक्त एकाच व्यक्तीचा फोटो का? सावरकरांसह अन्य महापुरुषांना स्थान मिळाले पाहिजे: विक्रम संपत
    काही दिवसानंतर या गावातील दुसरी व्यक्ती रामप्रसाद पठाडे यांने देखील महिलेच्या घरी येऊन ”तुझे आणि लक्ष्मण यांचे संबंध मला माहित असून, याबाबत तुझ्या पतीला सांगणार”, असल्याची धमकी महिलेला दिली आणि बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. ”ही घटना जर कुणाला सांगितली, तर तुझ्यासह तुझ्या पती व मुलांना देखील जिवे मारण्याची धमकी दिली”, व घरामधून निघून गेला.

    यानंतर २५ सप्टेंबर रोजी गावातील ज्ञानेश्वर पठाडे हा तिसरा व्यक्ती देखील महिलेच्या घरी जाऊन ”तुझे लक्ष्मण आणि रामप्रसाद यांचे सोबत असलेले संबंध सर्व माहिती माझ्याकडे असून, याबाबतचे छायाचित्रीकरण (व्हिडिओ) देखील मी काढलेले”, असल्याचे महिलेला सांगून तिच्यावर परत अत्याचार केला. या घटनेमुळे महिला घाबरली होती. घाबरलेल्या अवस्थेत महिलेने आपल्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. घाबरलेली महिला बघून कुटुंबातील व्यक्तीने तिला विश्वासात घेतले आणि सर्व हकीकत विचारपूस केली. यानंतर तिने सर्व घडलेला प्रकार आपल्या पतीला सांगितला.

    लागलीच महिलेच्या पतीने महिलेसह हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशन येथे येऊन या तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी लक्ष्मण पठाडे, ज्ञानेश्वर पठाडे आणि रामप्रसाद पठाडे यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले व जमादार आकाश पंडितकर या घटनेत पुढील तपास करत असून सध्या आरोपीला शोधण्याचे काम पोलीस करत आहेत.

    शर्मिला ठाकरेंची शाब्दिक फटकेबाजी, धारावीच्या मोर्चापासून ते किणी प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंना सुनावलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed