• Sat. Sep 21st, 2024

मी पुतण्यावर विश्वास दाखवला, उद्धव ठाकरेंनी भावावर दाखवायला हवा होता : शर्मिला ठाकरे

मी पुतण्यावर विश्वास दाखवला, उद्धव ठाकरेंनी भावावर दाखवायला हवा होता : शर्मिला ठाकरे

मुंबई : मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दिली आहे.

शर्मिला ठाकरे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन एसआयटी चौकशीवरून आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. त्यावर शर्मिला यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाल्या शर्मिला ठाकरे?

“मला वाटतं, असे आभार मानायची संधी उद्धव ठाकरेंनी मला आयुष्यात कधीच दिली नाही. किणी केस झाली, तेव्हापासून आतापर्यंत जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा ते फक्त चिमटेच काढत असतात. किमान जो भाऊ तुमच्यासोबत लहानाचा मोठा झाला, त्याच्यावर थोडा तरी विश्वास दाखवला असता, तर आम्हाला कधीतरी आभार मानायची वेळ आली असती. जे आता त्यांना मानावे लागतात” असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

“मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला, ज्या भावासोबत तुम्ही लहानाचे मोठे झालात, त्याला किणी केसच्या वेळी काय मदत केलीत? आजपर्यंत टोमणे देणं त्यांनी कधी थांबवलं आहे? कुठचीही वेळ आली की किणी केसवरुन टोमणे देतात. तुमच्या भावावर कधीतरी विश्वास ठेवून दाखवा, मग आम्हीपण आभार मानू” असंही शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

दोन तृतीयांश आमदार पाठीशी, म्हणून पक्ष तुमचा होत नाही, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचा युक्तिवाद
लालबाग येथील शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त शर्मिला ठाकरे बोलत होत्या. “आम्ही लोकसभेसाठी काम करत नाही. आम्ही कोविड काळापासून काम करत आहोत. उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा धारावीबद्दल का निर्णय घेतले नाहीत? सरकार आल्यानंतर काही महिन्यांनी करोना आला. त्यावेळी तुमचं सरकार असताना तुम्ही का निर्णय घेतले नाहीत? तुम्हाला कोणी अडवलं होतं? धारावीचा पुनर्विकास करायचा होता तर तुमचं सरकार असताना करून टाकायचा, कोणी तुमचे हात धरले होते?” असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नाला गिरीश महाजनांच्या हजेरीचा आरोप, केसरकर म्हणतात, तो फोटो तर…
राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र तुमचं सरकार असताना तुम्ही आरक्षणाचं विधेयक विधानसभेत का मंजूर केलं नाही? हा प्रश्न तर करोना काळात सुरू झाला नव्हता. मराठा समाजाच्या आरक्षणाचे मोर्चे वर्षानुवर्षे निघत आहेत. मग तुम्ही त्यांना आरक्षण का दिलं नाही? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला विचारला.

आदित्य यांची बाजू सावरल्यानं उद्धव ठाकरेंकडून आभार; शर्मिला म्हणाल्या, आम्हाला संधी दिली नाही

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed