• Sun. Sep 22nd, 2024

राज्यात ६४ टक्केच पाणीसाठा, पुण्यासह प्रमुख शहरांवर पाणी कपातीची टांगती तलवार

राज्यात ६४ टक्केच पाणीसाठा, पुण्यासह प्रमुख शहरांवर पाणी कपातीची टांगती तलवार

पावसाअभावी खरीप आणि रब्बी पिके वाया गेली

पावसाअभावी खरीप आणि रब्बी पिके वाया गेली

राज्यात यंदा जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने मोठी ओढ दिली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने धरणे भरण्यास मदत झाली. पावसाअभावी खरीप आणि रब्बी हंगामातील बहुतांश पिके वाया गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने १५ जिल्ह्यांमध्ये दुष्काळ स्थिती असल्याचे जाहीर केले होते. त्यावर केंद्रीय पथकाने नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे.

‘खडकवासला’मध्ये ७९ टक्के पाणी

‘खडकवासला’मध्ये ७९ टक्के पाणी

पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव धरणांमध्ये सुमारे ७९ टक्के म्हणजेच २३ टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आतापासून पुणेकरांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. पुणे जिल्ह्यातील टेमघर धरणात ४२ टक्के पाणी असून उर्वरीत जिल्ह्यातील२१ धरणांमध्ये सुमारे ६९ ते ९६ टक्क्यांदरम्यान पाणीसाठा आहे.

पुणे विभागात ७१ टक्के पाणी

पुणे विभागात ७१ टक्के पाणी

पुणे विभागातील ३५ धरणांमध्ये ७१ टक्के पाणीसाठा आहे. सोलापूर जिल्ह्यात पाण्याची स्थिती थोडी खराब आहे. उजनी धरणात पाणीसाठा कमी असल्याने सोलापूर जिल्ह्यात पाणी टंचाईची चिन्हे आहेत. उजनीत सद्या २१.४७ टक्के पाणीसाठा आहे. कोल्हापूरच्या दूधगंगा धरण ७९.४५ टक्के, राधानगरमध्ये ८५ टक्के पाणीसाठा आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी कमी, पण कोकण, नागपुरात चिंता नाही

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी कमी, पण कोकण, नागपुरात चिंता नाही

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात जूनपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा जमा झाले. त्यामुळे सध्या या विभागातील धरणांमध्ये जेमतेम ३७ टक्के पाणीसाठा आहे. आगामी काळात राज्यात सर्वाधिक पाणी टंचाईच्या झळा या विभागाला बसण्याची भीती आहे. तर, पाऊस चांगला झाल्याने कोकणात पाण्याची सध्या चिंता नाही. नागपुरातील पाण्याचा साठा पाहता मार्च एप्रिलमध्ये टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये फार गंभीर स्थिती सध्या नाही. अमरावती विभागात खडकपूर्णा, नळगंगा या धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्याने तेथे चिंतेचा विषय आहे.

राज्यातील धरणांची विभागनिहाय पाण्याची स्थिती (पाणीसाठा टीएमसीमध्ये)

राज्यातील धरणांची विभागनिहाय पाण्याची स्थिती (पाणीसाठा टीएमसीमध्ये)

विभागाची नावे धरणांची संख्या आजचा साठा गतवर्षीचा साठा

पुणे ७२० ६८.१० ८६.३१

नागपूर ३८३ ७०.४० ७९.३४

अमरावती २६१ ७४.९३ ८८.३५

छ. संभाजीनगर ९२० ३७.०९ ८५.३०

नाशिक ५३७ ६८.५७ ८९.४०

कोकण १७३ ८०.५६ ८१.५३

एकूण २९९४ ६४.६५ ८५.५४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed