• Mon. Nov 11th, 2024

    भीमा कोरेगाव शौर्यदिनाचा निधी बार्टीतून खर्च न करता जिल्हा परिषदेतून खर्च करावा, संघटनांची मागणी

    भीमा कोरेगाव शौर्यदिनाचा निधी बार्टीतून खर्च न करता जिल्हा परिषदेतून खर्च करावा, संघटनांची मागणी

    पुणे : पेरणे फाटा येथे १८१८ साली भिमा कोरेगाव लढ्यामध्ये अद्वितीय शौर्य गाजविणाऱ्या शुरवीर महार योद्ध्यांच्या गौरवार्थ उभारण्यात आलेल्या भीमा कोरेगांव विजयस्तंभ अभिवादनासाठी म्हणजेच १ जानेवारी २०२४ रोजी शौर्यदिन साजरा करण्यासाठी देशभरातून किमान २० लाख भीम अनुयायी अभिवादनासाठी दाखल होणार आहेत.

    सदर शौर्यदिनाच्या नियोजनाच्या अनुषंगाने जिल्हधिकारी पुणे यांचे अध्यक्षतेखाली प्रशासकीय समितीने अभिवादन सोहळयासाठी येणाऱ्या अनुयायांना देण्यात येणाऱ्या सर्व तऱ्हेच्या पायाभूत सुविधांसाठी सुमारे १४ कोटी रुपयांची निधीची मागणी विविध विभागांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांचेकडे केलेली आहे.

    भीमा कोरेगावला येणाऱ्या लोकांसाठी जेवणावळी नको, ‘बार्टी’चा पैसा संशोधन आणि प्रशिक्षणासाठीच वापरा : वंचित

    शौर्यदिनाचा हा संपूर्ण खर्च बार्टीकडून न करता यंदाच्या वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था या नात्याने पुणे जिल्हा परिषद पुणे यांचे खात्यातून करावा अथवा जिल्हाधिकारी पुणे यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीला राज्य शासनाकडून स्वतंत्रपणे बजेट उपलब्ध करुन देण्यात येवून त्याद्वारे भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन सोहळा साजरा करण्यात यावा अशी मागणी आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे करण्यात आली.

    भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, बसपा शहर अध्यक्ष रमेश गायकवाड, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस मिलिंद अहिरे यांचेसह सत्यवान गायकवाड, शबाना मुलाणी इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केली.

    IAS अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीच्या अंगावर घातली गाडी, आरोपीला बेड्या, आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?

    दरम्यान सदर मागणीचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांना पाठविण्यात आले असून याची कॉपी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे दिलेली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed