• Wed. Nov 13th, 2024
    माणुसकीचे दर्शन! रिक्षात महिलेची पर्स पडली; तरुणाने ऐवजासह केली परत, प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

    धुळे: शहरातील रहिवाशी असलेल्या एका महिलेचे हरवलेले दागिने आणि रोख रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या धुळे शहरातील हॉटेल चालक पप्पू माळी याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सत्कार केला असुन त्याच्या प्रमाणिकपणाचे कौतुक ही केले आहे. हॉटले चालक असलेल्या पप्पू माळी यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.
    मुंबईत हप्ते मागून पोलीस कॉन्स्टेबलचा पोरगा झाला डॉन; उभारली ५५,६१० कोटींची ‘D’ कंपनी
    मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास धुळे शहरातील फाशीपुल चौकात मोनिका राजपूत ह्या रिक्षातून प्रवास करत होत्या. त्याच वेळी त्यांची लाल रंगाची पर्स रिक्षात पडली. हे त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र फाशी पूल चौकात एका हॉटेल व्यावसायिकाला ही बेवारस पर्स आढळून आली. त्यांनी ते तपासले असता त्यामध्ये हजारो रुपये रोख आणि सोने चांदी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या पर्समध्ये रक्कम आणि दागिने असल्याने पप्पू माळी यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ सदरची पर्स धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली.

    राज यांची मिमिक्री करत उद्धव ठाकरेंनी सुनावलं

    धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना तात्काळ लेडीज पर्समध्ये मिळून आलेल्या कागदपत्रांच्या आधारे मोनिका जयसिंग राजपूत रा. फाशी पूल धुळे यांना संपर्क करत माहिती दिली. याबाबत धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे महिलेला बोलवत खातर जमा करत ७२ हजार रुपये रोख व पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने महिलेला देण्यात आले आहे. यावेळी प्रामाणिक कर्तव्य बजावणाऱ्या पप्पू माळी यांचा पोलीस अधीक्षक यांनी सत्कार करत लोकांनी अशीच जागरूकता दाखवावी, असे आवाहन देखील यावेळी केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed