• Sat. Sep 21st, 2024

नाशिककरांनो, तुम्ही पित असलेलं पाणी शुध्द आहे का? जिल्ह्यात ‘या’ गावांचे पाणी दूषित, वाचा लिस्ट

नाशिककरांनो, तुम्ही पित असलेलं पाणी शुध्द आहे का? जिल्ह्यात ‘या’ गावांचे पाणी दूषित, वाचा लिस्ट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक तालुक्‍यातील लाखलगावच्‍या ग्रामस्‍थांना दूषित पाण्यामुळे गॅस्‍ट्रोची लागण झाल्‍याचे समोर आले होते. यानंतर जिल्‍हाभरातील विविध तालुक्‍यांमध्ये पाण्याच्‍या १ हजार ८३९ नमुन्‍यांची चाचणी केली. त्यात सात तालुक्‍यातील २७ गावांतील पाणी दूषित असल्‍याचे समोर आले आहे. सर्वाधिक ९ नमुने सिन्नर तालुक्‍यातील असल्‍याने या तालुक्‍यातील ग्रामस्‍थांच्‍या आरोग्‍याला सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. अहवाल प्राप्त झाल्‍यानंतर आरोग्‍य यंत्रणा सतर्क झाली आहे.

जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागातर्फे नोव्‍हेंबरमध्ये हे नमुने घेतले होते. कमी पाऊस झाल्‍याने आतापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे उपलब्‍ध पाणी दूषित असल्‍याने चिंतेत आणखी भर पडली आहे. दूषित पाणी, ब्लिचिंग पावडरचे नमुने आढळणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समितींना नोटीस बजावण्यात येते. वर्षात दोन वेळा ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण करून तपासणी केली जाते. या सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायतींना लाल कार्ड, पिवळे कार्ड, हिरवे कार्ड वितरित केले जातात. लाल, पिवळे कार्ड मिळालेल्‍या ग्रामपंचायत स्रोतांच्या त्रुटीत सुधारणा करून हिरवे कार्डात रूपांतर करण्यासाठी प्रयत्‍न केले जातात. साथीच्‍या रोगांचे प्रमाण जिल्‍हास्‍तरावर वाढत असताना आरोग्‍याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.
नाशिककरांनो सावधान…! वेळीच ओळखा झिकाचा धोका, शहरात एकोणीस गर्भवती संशयित, काय आहेत लक्षणं?
ऑक्‍टोबरमध्ये ६७ नमुने दूषित

गेल्‍या महिन्‍यात २७ नमुने दूषित आढळले आहेत. तत्‍पूर्वी ऑक्‍टोबरमध्ये १५ तालुक्‍यातील २ हजार ५४९ नमुने तपासणीसाठी संकलित केले होते. यापैकी ६७ नमुने दूषित असल्‍याचे समोर आले होते. त्‍या तुलनेत नोव्‍हेंबरमध्ये आढळलेल्‍या दूषित नमुन्‍यांची संख्या घटली आहे.

तालुकानिहाय तपासणीचा तपशील
तालुका संकलित नमुने दूषित नमुने

सिन्नर ६४ ९
मालेगाव १५४ ६
त्र्यंबकेश्‍वर १४० ४
सुरगाणा २२७ ४
देवळा ८६ २
नांदगाव ८५ १
चांदवड ६७ १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed