• Mon. Nov 25th, 2024

    ‘भिवापुरी’ ठसका राहणार कायम; मिरचीचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय

    ‘भिवापुरी’ ठसका राहणार कायम; मिरचीचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विभागाचा मोठा निर्णय

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून आपली वेगळी ओळख टिकवून असलेली, चव आणि आकाराच्या बाबतीत वेगळेपण जपणारी भिवापुरी मिरची नामशेष होत आहे. संकरित अर्थात हायब्रीड वाणाच्या उत्पादनाच्या तुलनेत या मिरचीचे उत्पादन खूप कमी आहे. त्यामुळे शेतकरीही निरुत्साही असून मिरचीचे उत्पादन घटले आहे. भिवापुरी मिरचीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आता कृषी विभागाने प्रयोग हाती घेतला असून ७५ एकरवर या मिरचीचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    -भिवापुरीच्या बियाणांची उत्पादनक्षमता इतर मिरचीच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे या मिरचीचे लागवडीखालील क्षेत्र वाढलेले नाही.

    -या मिरचीचे उत्पादन एकरी १५ ते २० क्विंटल असून संकरित अर्थात हायब्रीड वाणाचे उत्पादन एकरी ३० क्विंटलच्या वर आहे. त्यामुळे शेतकरी भिवापूर मिरचीची लागवड करण्यास तयार होत नाहीत.

    -२०२० मध्ये १२५ एकरवर उत्पादन घेण्यात आले होते. २०२२मध्ये १०० एकर आणि केवळ २५ ते ३० एकर क्षेत्रात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. किमान दोनशे वर्षे जुनी भिवापुरी मिरची नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

    -नागपूरने फक्त संत्र्याची नाही तर भिवापुरी मिरचीही ओळख दिली आहे. काही वर्षांपूर्वी सरकारने या मिरचीला जीआयएस टॅगिंग दिले. भिवापूर मिरचीचे वैशिष्ट्य म्हणजे, हिची साठवण क्षमता.

    -शिवाय, आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असलेली ही मिरची ‘अॅण्टिअॅसिडिटी’ अर्थात पित्तशामक आहे. हे पीक विशेषतः पारंपारिक आणि कोरडवाहू आहे.

    -नागपूर-गडचिरोली मार्गावर उमरेडनंतरचे दुसरे मोठे तालुक्याचे ठिकाण म्हणजे भिवापूर. इथले हे मूळ पीक असल्याने या गावावरून भिवापुरी मिरची असे नाव पडले.

    -या मिरचीला इतकी मागणी आहे की, देशभरातील व्यापारी ही मिरची खरेदी करण्यासाठी या छोट्याशा गावात येतात. इतकेच नाही तर चीन, मेक्सिकोसह इतर देशांना ही मिरची निर्यात केली जात होती.
    भाज्या पुन्हा कडाडल्या; भेंडी-गवार १०० रुपये किलोच्या घरात, जाणून घ्या इतर भाज्यांचे दर
    दोन वर्षे चालणार प्रयोग

    या मिरचीचे उत्पादन वाढविण्याचे काम शेतकरी महिलांना देण्यात आले आहेत. ७७ एकरवर दोन वर्षे हा प्रयोग चालणार आहे. डब्ल्यूसीएलच्या माध्यमातून याला सीएसआर फंड प्राप्त झाला आहे. उत्पादनक्षमचा वाढविण्यासाठी वेगवेगळे प्रयोग यावेळी करण्यात येतील. किडरोगाचा फटका या मिरचीला बसल्याने तशा उपाययोजनाही करण्यात येतील, असे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालक अर्चना कडू यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed