• Mon. Nov 25th, 2024
    हवामान बदलाचा हरभरा पिकाला फटका; बळीराजा अडचणीत, दोन एकर क्षेत्रावर नांगर फिरवला

    धुळे: वातावरण बदलाचा परिणाम पिकांवर होताना दिसून येत आहे. प्रामुख्याने रब्बी हंगामातील हरभरा पिकावर मोठा परिणाम धुळे जिल्ह्यात झालेला पहावयास मिळत असून हरभऱ्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. यामुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथे दोन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या हरभरा पिकावर शेतकऱ्याने नांगर फिरविला आहे. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.
    समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराजांसोबत घडला धक्कादायक प्रकार,फेसबुक पेज हॅक करुन नको त्या गोष्टींचं पोस्टिंग सुरु
    अवकाळी पाऊस आणि अधूनमधून ढगाळ वातावरण त्याचबरोबर सकाळी धुके पडत असल्यामुळे या वातावरण बदलाचा फटका हरभरा पिकाला बसल्यामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली. तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. यामुळे हरभरा पीक ठेवून देखील त्यातून चांगले उत्पादन येण्याची शक्यता कमीच आहे. या कारणाने शेतकऱ्याने अखेर नाईलाजास्तव आपल्या दोन एकरावरील हरभरा पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आली आहे.

    अजितदादांचा नागपूर मेट्रोतून प्रवास, मेट्रो प्रकल्पाची माहिती घेतली

    हवामान बदलाचा फटका बसल्याने शिरपूर तालुक्यातील तऱ्हाडी येथील शेतकऱ्याने आपल्या दोन एकरावरील हरभरा पिकावर नांगर फिरवला आहे. यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास ३० ते ३५ हजाराहून अधिकचा खर्च वाया गेला असून कृषी विभागाने या संदर्भातील दखल घेऊन मदत मिळवून द्यावी, अशी मागणी या शेतकऱ्यातर्फे करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed