नेमकं काय आहे प्रकार?
सत्यपाल विश्वनाथ चिंचोळकर (सत्यपाल महाराज) हे समाज प्रबोधनकार असून त्यांच्या सामाजिक प्रबोधन कार्यक्रमांचा व इतर सामाजिक उपक्रमांचा व्यापक प्रचार प्रसार व्हावा, या अनुषंगाने सोशल मीडियाच्या फेसबुक या माध्यमातून एक Satyapal Maharaj फेसबुक पेज तयार केले आहे. सदर फेसबुक पेज हे Satyapal maharaj या व्यक्तिगत फेसबुक अकाऊंटला लिंक आहे. १३ डिसेंबरला सायंकाळी साडे ७ वाजता सदर फेसबुक पेज वरून एक अश्लिल पोस्ट अपलोड केलेली दिसून आली. ती पोस्ट बघून सर्वच् जण अचंबित झालो. सदर पोस्ट तात्काळ हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतू आमच्या वैयक्तिक अकाऊंटला वापरण्याचे अधिकार बंद झाल्याचे दिसले. याबाबत आणखी माहिती घेतली असे की, फेसबुक पेज हे हॅक झालेत असे कळले. सदर फेसबुक पेज वरून यानंतर कोणत्याही प्रकारची चुकीची किंवा अश्लील पोस्ट शेअर झाल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही, हे फेसबुक पेज आपल्या स्तरावरून बंद करण्यात यावे व घडलेल्या प्रकारची शहानिशा करावी, अशी मागणी तक्रारीतून केली आहे.
लोकांचे रात्री फोन आले अन्..
सत्यपाल महाराज म्हणाले की माझं, ‘सत्यपाल महाराज’ या नावानं फेसबुक पेज आहे, नेहमी त्यावरून किर्तन करतो. हे पेज १३ डिंसेबरला एकाकी बंद पडलं, या पेजवर त्याच दिवशीपासून अश्लील फोटो अपलोड होणं सुरू झाले. तेव्हाच लोकांचे रात्री फोन यायला लागलेत आणि हा प्रकार लक्षात आला असल्याचे सत्यपाल महाराज म्हणाले. त्यामुळ फेसबुक अकाउंट पेज हॅक झालं किंवा काय झालंय? हे अथवा मला यातलं काही कळत नाही. दरम्यान समाज जनजागृती आणि महामानवांचे विचार लोकांपर्यंत जावा यासाठी, या द्वारे प्रयत्न असतो, असेही सत्यपाल महाराज म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले की हा प्रकार थांबावा यासाठी त्यांच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरही प्रकार थांबला जात नाही. संबंधित पोलिसांनी अजून त्यावर कुठलेही पाऊल उचलले नाही. तक्रार करूनही दुसऱ्या दिवशी पुन्हा अश्लिल फोटो पोस्ट झाल्याचे दिसले. महाराज म्हटले की अनेक भागात कीर्तनाचे प्रोग्राम सुरू आहेत, येथे बरेच लोकांचे कॉल येत आहेत, अखेर असे फेसबुक पेज वरील प्रकार कुठेतरी थांबले पाहिजे. यासाठी अकोला पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची आज भेट घेतली.
‘त्या’ लोकांकडून आता आपल्या जीवालाही धोका…
‘मी’ कीर्तनातून, समाजप्रबोधनातून अंधश्रद्धा आणि वाईट चालीरितींवर प्रहार करतो. त्याने दुखावलेल्या लोकांचेच हे काम आहे, असा ठाम आत्मविश्वास आहे, असेही सत्यपाल महाराज म्हणाले. पाच वर्षांपुर्वी माझ्यावर हल्ला करणारे आणि हॅकिग करणारे एकच आहेत, आज मोठ्या संख्येने लोकप्रियता वाढली, त्यामुळ मला बदनाम करण्याच् हे काम सुरू आहेत. कीर्तनादरम्यानही अनेकदा अडथळे आणतात, त्याचं कारण म्हणजे माझ्या कीर्तनातून होणारी जनजागृती कुठेतरी थांबली पाहिजे, यासाठी काही लोकांना दारू पाजून कीर्तनादरम्यान पाठवले जाते. याच लोकांकडून आता आपल्या जीवालाही धोका असल्याची भीती सत्यपाल महाराजांनी व्यक्त केली आहे. तरीही ‘मी’ माझं काम थांबवणार नाही, असा इशाराही सत्यपाल महाराज यांनी दिला.
Read Latest Maharashtra News And Marathi News