• Sat. Sep 21st, 2024
आधी आजारांनी ग्रासलं, नंतर मित्रांनी हिणवलं; मात्र शेतकऱ्याने पैजेचा विडा उचलत गाठलं यशोशिखर

पुणे : मित्रांनी हिणवलेली गोष्ट जीवाला लागली. पैलवान होण्यासाठी चक्क पाच लाखांची पैज लावली. त्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर वयाची अडसर कधीच येत नाही. तुम्ही ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचू शकता. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील असणाऱ्या लोणी काळभोर येथील ५२ वर्षीय शेतकऱ्याने हे सिद्ध करून दाखविले आहे. जागतिक दर्जाच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत या शेतकऱ्याने तृतीय क्रमांक मिळवून यशोशिखर गाठले आहे. मित्रांच्या पैजेचा विडा त्यांनी जिंकून दाखवला.
बायको मुलीसह माहेरी; पती संतापला, ‘तुझ्यामुळेच सगळं होतयं’ म्हणत सासूसोबत धक्कादायक कृत्यमिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र गायकवाड हे कुंजीरवाडी येथील प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. १९९१ साली गायकवाड यांच्या घरावर दरोडा पडला होता. यावेळी त्यांना बेदम मारहाण झाली होती. या मारहाणीत गायकवाड यांच्या कानाजवळची शीर ब्लॉक झाली होती. तेव्हापासून गायकवाड यांना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. अनेक औषधोपचार करून ही त्यांची या आजारापासून सुटका झाली नाही. या आजारासाठी गायकवाड यांनी तब्बल २० वर्षे वेदनाशामक गोळ्या खाल्ल्या. एवढेच नव्हे तर डोकेदुखीसाठी त्यांना खिशात बामची बाटली कायम ठेवावी लागत असे.

त्यानंतर २०१० पासून त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास सुरु झाला. या सततच्या आजारपणाला गायकवाड कंटाळले होते. गायकवाड हे सतत आजारी असायचे. मग अनेकांना प्रश्न पडतो, अशी व्यक्ती वयाच्या ५२ व्या वर्षी बॉडी बिल्डर होऊन शरीर सौष्ठव स्पर्धा कशी गाजवू शकते? तर, गायकवाड यांचा पहिलवान होण्याचा प्रवास चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ पासून सुरू झाला. गायकवाड हे थेऊर फाटा येथे मित्राच्या दुकानात बसले होते. त्यावेळी ते मोबाईलवर शरीर सौष्ठव स्पर्धेचे व्हिडिओ पाहत होते. एका मित्राने त्यांची चेष्टा केली. गंमतीत त्यांना विचारले की, ‘असले व्हिडिओ तू कशाला पाहतोस? आधी तुझे शरीर बघ…’ या चेष्टेमुळे गायकवाड दुखावले गेले.

संसदेत धुराच्या कांड्या फोडणाऱ्या अमोल शिंदेविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा, असीम सरोदे लढणार खटला

त्याचवेळी चार मित्रांची तब्बल दोन लाखांची पैज लागली. ‘तू बॉडी बिल्डर होऊन दाखव,’ असे आव्हान मित्रांनी गायकवाड यांना दिले. या गंमतीतूनच बॉडी बिल्डर गायकवाड यांचा जन्म झाला. पैज जिंकण्याच्या जिद्दीपोटी गायकवाड यांनी तातडीने त्यांचे मार्गदर्शक व कुंजीरवाडी गावचे माजी सरपंच तथा गिर्यारोहक सचिन तुपे यांची भेट घेतली. मला व्यायाम सुरु करून बॉडी बिल्डर व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर सचिन तुपे गायकवाड यांना घेऊन रामदरा डोंगर चढण्यासाठी गेले. त्यावेळी गायकवाड हे फक्त ३०० मीटर डोंगर चढू शकले आणि माघारी आले. दरम्यान, त्यांच्या सर्व मित्रांनी पुन्हा ‘ही पैज तू हरणार’ म्हणत त्यांना डिवचले. गायकवाड यांनी मित्रांचे बोलणे मनावर घेत एकट्यानेच रामदरा डोंगर चढण्याचा सराव सुरू केला.

एक महिन्यानंतर गायकवाड यांनी स्वतः तुपे यांना सांगितले मी, आता मी तुमच्यासोबत रामदरा डोंगर चढण्यास सज्ज आहे. पुढे सर्व मित्र रामदरा डोंगर चढू लागले. पहिलवान होण्याची जिद्द गायकवाड यांना स्वस्त बसू देत नव्हती. यासाठी राजेंद्र गायकवाड यांनी हडपसर येथे जिमला जाण्यास सुरूवात केली. अवघे २२ वर्षे वयाचे प्रशिक्षक ओमकार जगताप यांच्याकडे प्रशिक्षण घेऊ लागले. गायकवाड यांनी आहार, व्यायाम व जिद्दीच्या जोरावर वजन नियंत्रित केले. मित्रांसोबत लावलेली पैज अखेर गायकवाड यांनी जिंकून दाखवली. आता मित्रांनीच गायकवाड यांच्याकडून प्रेरणा घेऊन व्यायामाला सुरवात केली आहे.
इस्लाम व ख्रिश्चन धर्म स्वीकारूनही आदिवासी आरक्षण घेणं चूक, विधान परिषदेत जोरदार खडाजंगी
दरम्यान, गोवा येथे नुकतीच जागतिक दर्जाची ‘मी नैसर्गिक’ स्पर्धा (ICN) पार पडली. या स्पर्धेत जगभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत राजेंद्र गायकवाड हे पहिल्यांदाच सहभागी झाले होते. गायकवाड यांनी या स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गायकवाड म्हणतात की, शारीरिक व्याधींमुळे मी ग्रासलो होती. त्यातून बाहेर पाडण्यासाठी वयाच्या ४८ व्या वर्षी व्यायाम करण्यास सुरवात केली. यासाठी सचिन तुपे आणि राजेंद्र गायकवाड यांनी योग्य मार्गदर्शन केले. यामुळेच मी जागतिक दर्जाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. याचा मला आनंद झाला आहे. तसेच व्यायामामुळे माझे शरीर सदृढ झाले असून, माझ्या व्याधीदेखील संपल्या आहेत. आजच्या पालकांनी मुलांच्या व्यायामाकडे लक्ष दिले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed