• Sat. Sep 21st, 2024

साफसफाई करण्यासाठी तरुण पोल्ट्री शेडवर गेला,पण विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

साफसफाई करण्यासाठी तरुण पोल्ट्री शेडवर गेला,पण विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

सातारा : पोल्ट्री शेड धुताना विजेचा धक्का लागल्याने सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली. जावळी तालुक्यातील मोरघर येथील युवक व सामाजिक कार्यकर्ते विजय सुमंत गायकवाड उर्फ पप्पू गायकवाड (वय ३८) यांचे विजेच्या धक्क्याने आकस्मित निधन झाले. सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मोरघरसह आनेवाडी, सायगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेबाबत माहिती अशी की, काल सोमवारी सकाळी ११ वाजता नेहमीप्रमाणे विजय गायकवाड हे भणंग (ता. जावळी) येथील पोल्ट्री शेडमध्ये आपल्या रोजच्या कामासाठी गेले होते. एचटीपी मोटरच्या साह्याने शेड धुऊन साफसफाई करण्याचे काम सुरू होते. मात्र, त्यावेळी अचानक या मोटरचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी शेडमध्ये ते एकटेच असल्याने कोणालाही या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत काहीच समजले नाही. काल दिवसभर कुटुंबीयांनी त्यांना मोबाईलवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. मात्र, कॉल उचलला न गेल्याने शेवटी त्यांच्या कुटुंबातील व मित्रमंडळींनी रात्री साडेआठ वाजता भणंग येथील शेडवर जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी गायकवाड मृत अवस्थेत पडलेले आढळून आले.

प्रॉपर्टी पेपर्सवर सह्या घेऊन वडिलांना घरातून हाकललं; वृद्धावर सोमवार पेठेतील अन्नदान केंद्रावर जेवण्याची वेळविजय गायकवाड हे मोरघर गावातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे कार्यकर्ते होते. कमी वयात पोल्ट्री व्यवसाय टाकून आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली होती. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, दोन मुले, वडील असा परिवार आहे. आकस्मिक घटनेमुळे मोरघर गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद मेढा पोलीस स्टेशनला झाली झाली असून घटनेचा तपास सुरू आहे.

शर्यत जिंकल्यावर बैलांवर गुलाल उधळला; अमित ठाकरेंनी बैलगाडी गाडामालकांसह आयोजकांना भर स्टेजवर धारेवर धरलं

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed