• Mon. Nov 25th, 2024
    कॅसिनोवरून आरोप प्रत्यारोप, फडणवीस-खडसे यांच्यात विधान परिषदेत जोरदार कलगीतुरा

    म. टा. प्रतिनिधी, नागपू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्यात अनेक दिवसानंतर एकमेकांवर केलेल्या शाब्दिक टोलेबाजीने विधानपरिषदेतील वातावरण सोमवारी काही वेळेकरिता चांगलेच तापले होते. कॅसिनो नियंत्रण आणि कर निरसन विधेयकावरून खडसे यांनी फडणवीसांना यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. तर फडणवीस यांनीही त्यांच्या शैलीत खडसे यांना उत्तरे दिली.

    राज्यात १९७६ साली तत्कालीन सरकारने महसूल वाढीसाठी राज्यात कॅसिनो सुरू करण्याला मंजुरी देण्यासंबंधीचा कायदा करण्यात आला होता. हा कायदा विधानसभेत रद्द केल्यानंतर त्यासंबंधीचे विधेयक विधानपरिषदेत मांडण्यात आले. मात्र, त्यापूर्वी झालेल्या चर्चेत विरोधी बाकावरून खडसे यांनी फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

    महाराष्ट्र कॅसिनो कायदा कायमस्वरुपी रद्द होणार; विधानसभेत विधेयक मंजूर
    राज्यात कॅसिनो सुरू होण्याला विरोधच आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात जुगाराचे अड्डे सुरू असून यासंदर्भात गृहमंत्री म्हणून आतापर्यंत ५२ वेळा पुराव्यांसह पत्र दिल्याचे सांगताना आपण कार्यक्षम गृहमंत्री अशी आपली ओळख आहे. मात्र, इतक्या पत्रानंतरही कुठलीही कारवाई न केल्याने आपण त्याबाबत अकार्यक्षम ठरले आहात अशी टीका खडसे यांनी यावेळी केली.

    जुगार अड्डे चालवणाऱ्यांची नावे देऊनही कारवाई होत नाही त्यामुळे त्यांना काही राजकीय आशीर्वाद तर नाही ना? असा प्रश्नही खडसे यांनी यावेळी उपस्थित केला. विधानसभेत तुमच्याच मार्गदर्शनात मी काम केले आहे. तुम्ही मागे बसून जे पुरावे द्यायचात त्यामुळेच सभागृहात सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणता यायचे’ असा खोचक टोलाही फडणवीस यांनी लगावला.

    अजितदादा सत्तेत नको हे भाजपच्या कोणत्या नेत्याला पत्र लिहून सांगणार? अंधारेंचा फडणवीसांना थेट सवाल

    यावेळी फडणवीस यांनी उत्तर देताना ‘नाथाभाऊ आपल्याबद्दल माझ्या मनात आदर आहे, आणि मलासुद्धा माहिती आहे माझ्याबद्दल आपल्या मनात किती प्रेम आहे’ असे सांगत खडसेंनी उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देण्यास सुरुवात केली. फडणवीस पुढे म्हणाले, ‘आपण केलेल्या तक्रारी ही संबंधिताचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक इतक्याच आहे. कधीही त्यासंबंधीचे पुरावे दिलेले नाही. आपल्या सारख्या ज्येष्ठ सदस्यांकडून हे अपेक्षित नाही. तुम्ही दिलेली नावे ही केवळ राजकीय हेतूने प्रेरित आहेत’ असा पलटवारही फडणवीस यांनी केली. यावेळी फडणवीसांनी पुरावे तुमच्याकडे नसतील तर मी देऊ का? असा प्रतिसवाल करत पुरावे द्या नक्की कारवाई करू, असे आश्वासन फडणवीसांनी यावेळी दिले. विधेयक मागे घेण्याच्या या प्रस्तावावरून दोन्ही नेत्यांमध्ये सभागृहात झालेल्या या टोलेबाजीने सभागृहात हजर असलेले सदस्य लक्ष देऊन ऐकत होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *