• Mon. Nov 25th, 2024
    आधी लग्नाचे आमिष; नंतर १५ वर्षीय मुलीला पळवून नेले, न्यायालयाने आरोपीला ‘अशी’ दिली शिक्षा

    छत्रपती संभाजीनगर: लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीला पळवून नेणारा आरोपी रितेश बद्रीनाथ बोरडे याला सहा महिने सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी ठोठावली आहे. या प्रकरणी १५ वर्षीय पीडितेच्या सावत्र आईने फिर्याद दिली होती.
    क्रेटा कारचा पहाटेच्या सुमारास सिनेस्टाईल पाठलाग, गा़डीतून पकडला अवैध दारू साठा; किंमत तब्बल…
    फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या पतीच्या पहिल्या पत्नीचे आजारपणामुळे निधन झाले. पहिल्या पत्नीला दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. फिर्यादी ही पती आणि पहिल्या पत्नीच्या मुलांसह एकत्र राहतात. सात जून २०२० रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास पीडिता कोणाला काही न सांगता घरातून निघून गेली. प्रकरणात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन आरोपी रितेश बद्रीनाथ बोरडे (२०) आणि पीडितेला आरोपीच्या घरातून ताब्यात घेतले. या वेळी पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, पीडिता शिक्षण घेत असताना दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.

    मनमाडच्या सभेत गोंधळ हा भाडोत्री कार्यक्रम, सुहास कांदेंनी ताईगिरीच बघितली नाही; अंधारेंचा पलटवार

    ७ जून २०२० रोजी रितेशने पीडितेला ‘पळून जाऊन लग्न करू’ असे म्हणत पीडितेला स्वत:च्या घरी आणले. त्याने पीडितेशी लग्न करायचे असल्याचे आई-वडिलांना सांगितले. त्यावर आरोपीच्या वडिलांनी मुलगी अल्पवयीन असल्याने लग्न करता येणार नसल्याचे समजावून सांगितले. एक दिवस पीडिता आरोपीच्या घरी थांबल्यानंतर दुसर्‍या दिवशी पोलिसांनी तपास करुन आरोपीला आणि पीडितेला आरोपीच्या घरातून ताब्यात घेतले. खटल्याच्या सुनावणीवेळी, सहाय्यक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी रितेश बोरडे याला दोषी ठरवून भादंवी कलम ३६३ अन्वये सहा महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed