• Sat. Sep 21st, 2024
पुण्यातून पर्यटनासाठी दापोलीत आला; समुद्रात पोहण्याचा मोह बेतला जीवावर, तरुणाच्या जाण्याने हळहळ

रत्नागिरी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील घटना ताजी असतानाच सलग दुसऱ्या दिवशी दापोली तालुक्यातील समुद्र किनार्‍यावर पुण्यातील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दशरथ जगदीश यादव ( ४०, राहणार घोरपडे पेठ, वेगा सेंटर समोर, शंकर शेठ रोड स्वारगेट पुणे) असं या मृत्यू झालेल्या पर्यटकांचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यांचा समुद्रस्नान करत असताना कर्दे समुद्रकिनारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
स्वतःचं काळीज देऊन वाचवले भावाचे प्राण, जीवनदान देणाऱ्या बहिणीच्या निखळ प्रेमाची सर्वत्र चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १० डिसेंबर रोजी रविवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या सुमारास घडली आहे. पुण्याहून फिरण्यासाठी आलेले पर्यटकांमधील दशरथ हे बेशुद्ध झाल्याचे लक्षात येताच त्यांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आले. ही घटना घडल्याचे कळताच स्थानिकांनीही त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी मदत केली. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दशरथ यांचे काही मित्र हे दापोली तालुक्यातील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. यावेळी दुर्दैवी घटना कर्दे समुद्रकिनारी घडली.

मराठा समाजाची मागणी मान्य व्हायला हवी, पण ओबीसींच्या ताटातलं आरक्षण काढून नका; संजय राऊतांची भूमिका

पुणे परिसरातील एकूण चार मित्र पर्यटनासाठी दापोली येथे आले होते. त्यावेळी दुर्दैवी घटना घडली. या घटनेत मृत्यू झालेले दशरथ हे पुणे येथे मच्छी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यू झालेले पर्यटक दशरथ यादव हे अविवाहित तरुण होते. त्यांच्या या अशा जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती त्यांच्या पुण्यातील नातेवाईकांना कळविण्यात आली आहे. त्यांचे नातेवाईक पुणे येथून दापोली येथे दाखल झाल्यावर शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. या दुर्दैवी घटनेची खबर किरण कैलास निवंगुने राहणार पुणे यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली आहे. या सगळ्या दुर्दैवी घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात रविवारी सायंकाळी उशिरा करण्यात आली आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed