• Sat. Sep 21st, 2024
स्वतःचं काळीज देऊन वाचवले भावाचे प्राण, जीवनदान देणाऱ्या बहिणीच्या निखळ प्रेमाची सर्वत्र चर्चा

कल्याण: वेड्या बहिणीची वेडी ही माया.. या उक्तीप्रमाणे कल्याणमधील एका बहिणीने स्वतः चे काळीज भावाला देऊन भावाचा जीव वाचवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस खात्यात कार्यरत असणाऱ्या भावाचं लिव्हर अर्थात काळीज खराब झालं. भाऊ मरण यातना सहन करत होता. लिव्हर ट्रान्सप्लांटची डॉक्टरांनी भावाच्या नातेवाईकांना सल्ला दिला. मात्र लिव्हर कुठे मिळत नव्हते. भावाचा जीव वाचविण्यासाठी बहीण माधुरी काळे हिने क्षणार्धात यकृताचा भाग देण्याची तयारी दाखविली. भावाला यकृताचा ६५ टक्के भाग देत जीवनदान दिले.
भाषणानंतर संजय राऊतांचा ताफा निघाला; तेवढ्यात वाहनासमोर चपला पडल्या… नेमकं काय घडलं?
मुलुंडच्या खाजगी रुग्णालयात ही किचकट शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. बहीण भावाच्या मदतीला धावून आली. स्वतःच काळीज भावाला देत जीवदान दिल्याने बहिणीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अभिजीत भाबल आणि माधुरी काळे ही दोन सख्खी भावंडे आहेत. माधुरी शिक्षिका आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगरसेविका तर अभिजीत महाराष्ट्र पोलीसचा खेळाडू आहेत. काही दिवसांपूर्वी अभिजीत यांचे लिव्हर खराब झाल्याने ते बदलण्याची गरज असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्यांचा जीव वाचविण्यासाठी आपण यकृत देण्यास तयार असल्याचे माधुरी यांनी स्वत:हून सांगितले. यानंतर आवश्यक चाचण्या करून त्या डोनर होऊ शकतात.

मराठा समाजाची मागणी मान्य व्हायला हवी, पण ओबीसींच्या ताटातलं आरक्षण काढून नका; संजय राऊतांची भूमिका

यावर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब करताच माधुरी या न डगमगता वैद्यकीय परीक्षणासह शस्त्रक्रियेपर्यंतच्या सर्व कठीण परीक्षांना हसत हसत सामोरे गेल्या. माधुरी यांनी आपल्या यकृताचा ६५ टक्के भाग देत भाऊ बहीणीचे हे नाते एकमेकांच्या काळजाचा तुकडा असल्याचे दाखवून दिले. २ डिसेंबर रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. माधुरी काळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी नगरसेवक आहेत. त्याचप्रमाणे ते कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात शिक्षिका देखील आहेत. सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक नात्यांना तितक्याच खंबीरपणे सांभाळणाऱ्या माधुरी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed