• Mon. Nov 25th, 2024

    मनसे पदाधिकाऱ्याकडून आदिवासी कुटुबांचा वेठबिगारीद्वारे छळ, १० वर्षांपासून विनामोबदला राबवले,आरोपींना अटक

    मनसे पदाधिकाऱ्याकडून आदिवासी कुटुबांचा वेठबिगारीद्वारे छळ, १० वर्षांपासून विनामोबदला राबवले,आरोपींना अटक

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण: आदिवासी, कातकरी समाजाच्या दोन कुटुंबांना घरे बांधून देत त्या बदल्यात मागील १० वर्षांपासून त्यांना कोणताही मोबदला न देता राबवून घेत त्यांचा अतोनात छळ करणाऱ्या दोन भावांविरोधात डोंबिवली मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत शहरात ही वेठबिगारीची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संजय पाटील आणि विजय पाटील अशी आरोपींची नावे आहेत. संजय हा मनसेचा पदाधिकारी आणि खोणी ग्रामपंचायतीचा सदस्य आहे.

    डोंबिवलीनजीकच्या खोणी गावाजवळील आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या अशोक वाघे यांच्यासह सुनील वाघे, सुंदरी वाघे, चांगीबाई वाघे, बेबी वाघे आणि अंकिता वाघे यांना याच गावात राहणारे संजय पाटील आणि विजय पाटील या दोघांनी चाळ स्वरूपात घरे बांधून दिली. त्याबदल्यात कोणताही मोबदला न देता शेतीच्या कामासाठी राबवून घेतले. कामावर न गेल्यास त्यांना मारहाण केली जात होती. या दरम्यान अशोक यांना पक्षाघाताचा झटका आल्याने ते घराबाहेर पडू शकत नसतानाही संजय, विजय यांनी सरकारी योजनेतून त्यांना १४ शेळ्या विकत घेऊन दिल्या. त्या शेळ्या दररोज चरण्यासाठी नेण्यासाठी अशोक यांच्यावर जबरदस्ती केली जात होती. या शेळ्या विकल्यानंतर त्याचा मोबदलाही त्यांना दिला जात नव्हता. एके दिवशी त्यांची पत्नी पालघरला गेली असताना आजारपणामुळे ते शेळ्यांना चरण्यासाठी नेऊ शकले नाहीत. यावेळी आरोपींनी वाघे यांच्या घरी जाऊन त्यांना बेदम मारहाण केली, असे आरोप आहेत.

    फेसबुकवर स्वत:ला श्रद्धांजली वाहिली मग कारागृहासमोरच गोळ्या झाडून घेतल्या, सोलापूर हादरलं

    मागील १० वर्षांपासून या आदिवासी, कातकरींचा अमानुष छळ करत त्यांना मारहाण केली जात असून त्यांचे रेशन कार्ड, बँकेचे पासबुकही संजय, विजय यांनी त्यांच्या ताब्यात ठेवले होते. या सगळ्या छळाला कंटाळून अखेर अशोक वाघे यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी राज्यस्तरीय आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पंडित यांनी पोलिस ठाण्यासह प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत तपासाची माहिती घेतली.

    श्रीकांत शिंदेकडून डोंबिवली पलावा जंक्शन पुलाची पाहाणी, अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *