शुक्रवारी रात्रीपासून अशीच वाहतूक कोंडी असल्याने दोन्ही महामार्गावर दहा-दहा मिनिटांच्या ब्लॉक घेऊन वाहतूक सोडली जात आहे. सुट्टीमुळे नागरिक घरातून मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने महामार्गवर शुक्रवारी रात्रीपासूनच वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे प्रवाशी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महामार्गावर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका बसल्यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर याबाबत उपायोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, तात्पुरत्या उपाययोजना होऊनही महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असल्याने यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची तीव्र मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून केली जात आहे.
काल रात्रीपासून सुरू असलेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रशासनाची मात्र चांगलीच धावपळ होत असल्याचे पहायला मिळत आहे. पुणे – मुंबई द्रुतगती महामर्ग हा दोन मेट्रो शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. मात्र जोडून सुट्ट्या आल्याने मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडले असून अवजड वाहने देखील महामार्गवर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे मात्र, वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
Read Latest Maharashtra News And Marathi News