• Fri. Nov 15th, 2024
    पादचारी दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत बदल, असा असेल पर्यायी मार्ग

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने येत्या ११ डिसेंबर या पादचारी दिनाच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक, गरूड गणपती चौक दरम्यान वॉकींग प्लाझा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान हा वॉकींग प्लाझा असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात येणार आहे.

    पुणे महापालिकेच्या वतीने पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझा आयोजित केला जातो. यंदा वॉकींग प्लाझाचे अतंर वाढविण्यात आले आहे. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरी सेवासदन चौक ते गरूड गणपती चौक दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान वाहतूक बदल करण्यात आला आहे.

    Union Budget 2024: मध्यमवर्गाला आयकरात सूट; उद्योग, शेतकऱ्यांना मदतीची आस, अर्थसंकल्पात कोणाला काय मिळणार?
    असा असेल वाहतूक बदल

    – लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांचे वाहतूकीस बंद करण्यात येत आहे.

    – सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक दरम्यान वाहतूकीची परिस्थीती पाहून आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येतील.

    पर्यायी मार्ग

    – लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकातून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जाईल.

    – कुमठेकर रस्त्यावरून लक्ष्मी रस्त्यावर जाणारी सर्व वाहने सरळ चितळे कॉर्नर डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने इच्छितस्थळी जातील.

    – रमणबाग चौकाकडून उंबऱ्या गणपती चौकाकडे जाणारी वाहने लक्ष्मी रस्त्याकडे न जाता सरळ केळकर रस्त्याने टिळक चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

    – निंबाळकर तालीम चौकाकडून कुंठे चौकाकडे जाणारी सर्व वाहने लक्ष्मी रस्त्याकडे न जाता सरळ केळकर रस्त्याने टिळक चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

    महायुती सरकारमध्ये अर्थमंत्री अजित पवारांचा विक्रम, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोटींची उड्डाणे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed