• Mon. Nov 25th, 2024
    बायका माहेरी गेल्या; दोन भावांनी दुसरं लग्न केलं, महिलांची पोलिसात धाव, नेमकं काय घडलं?

    धुळे: साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे दोन सख्ख्या भावांसोबत दोन सख्या बहिणींचा विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यानंतर दोघा भावांनी त्यांचा छळ सुरु केला. छळाला कंटाळून दोन्ही बहिणी माहेरी निघून आल्या. मात्र त्यानंतर या दोन्ही भावांनी दुसरा विवाह केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी चौघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहे.
    नातेवाईकाकडे जाते सांगत महिला घराबाहेर पडली; नंतर जे घडलं त्यानं कुटुंबाला बसला धक्का, प्रकरण काय?
    मिळालेल्या माहितीनुसार, देशशिरवाडे येथील दोन्ही बहिणींचा विवाह धुळे तालुक्यातील आर्वी येथील सुनील आणि अनिल सोनवणे या सख्या भावांशी २०१६ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी दोघी बहिणींचा छळ सुरू झाला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे दोन्ही बहिणी मुलांना घेऊन साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे माहेरी आल्या. कोरोना काळात त्यांचा सोनवणे कुटुंबियांशी संपर्क झाला नाही. त्यानंतर दोघी बहिणींना गाफील ठेवून सुनील आणि अनिल सोनवणे यांनी दुसरे लग्न करुन घेतले अशी तक्रार पीडित बहिणींनी दिली आहे.

    वाराणसीहून आणलेलं चांदीचं शिवलिंग भेट, Dhananjay Munde यांनी रेशीम हार घालून केलं CM-DCM चं स्वागत

    त्यावरुन सुनील संतोष सोनवणे, अनिल संतोष सोनवणे, संतोष जंगलू सोनवणे, कौशल्याबाई संतोष सोनवणे यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पीडित दोन्ही बहिणी कोरोना काळात माहेरी होत्या. महिला तक्रार निवारण कक्षात त्यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. दोघींच्या पतीने दुसरा विवाह केला असल्याचे त्या सांगत आहे. या प्रकरणी तपास होईल अशी माहिती सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed