• Sat. Sep 21st, 2024

उभ्या ट्रॅक्टरला धडकली दुचाकी; सप्तशृंगी मंदिराजवळ अपघात, दाम्पत्याचा मृत्यू

उभ्या ट्रॅक्टरला धडकली दुचाकी; सप्तशृंगी मंदिराजवळ अपघात, दाम्पत्याचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भरधाव जाणाऱ्या दुचाकीने उभ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवारी रात्री जळगाव जिल्ह्यातील गांधली (ता. अमळनेर) रस्त्यावर सप्तशृंगी मंदिराजवळ घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. युवराज दयाराम पाटील (वय ६२) व मंगलबाई युवराज पाटील (५५) अशी दाम्पत्याची नावे आहेत.

पिळोदा (ता. अमळनेर) येथील युवराज दयाराम पाटील व त्यांच्या पत्नी मंगलबाई दुचाकीने पारोळा येथे गेले होते. सायंकाळी गावाकडे परत येत असताना सप्तश्रृंगी मंदिराजवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांची दुचाकीची धडकली. त्यात युवराज पाटील यांचा जागीच मृत्यू झाला तर मंगलबाई यांचा श्वास सुरू असल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही वेळातच उपचार घेताना त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात भाऊ व दोन मुली आहेत. दरम्यान अमळनेर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दुभाजकावर बस चढली; महिला जखमी

अमळनेर शहरातील पैलाड भागातून बोरी नदी पुलावर प्रवेश करताना दुभाजकवर बस चढून अपघात झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. यात एक महिला गंभीर झाली. जळगावहुन शिंदखेडा जाणारी बस (एम.एच. १४ बी. टी २०८६) शहरातील पैलाड भागातून बोरी नदी पुलावर प्रवेश करत होती. तेव्हा अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकवर बस चढली. यात एक महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन माहिती जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed