• Sat. Sep 21st, 2024

कांदा विकून घरी जाताना शेतकऱ्यासोबत धक्कादायक प्रकार, चहासाठी थांबले अन् १९ लाख गमावले

कांदा विकून घरी जाताना शेतकऱ्यासोबत धक्कादायक प्रकार, चहासाठी थांबले अन् १९ लाख गमावले

सातारा : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची १९ लाखांची रोकड अज्ञाताने लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेळगावहून पुण्याकडे जाताना साताऱ्यातील वाढे फाट्यावर चहापाण्यासाठी थांबलेले असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे चोरट्यांनी पाळत ठेवून मोठ्या रकमेवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सतीश शंभर ढवळे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सतीश शंकर ढवळे (वय ३५, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) हा शेतकरी आपला कांदा विक्रीसाठी टेम्पोतून बेळगावला घेऊन गेला होता. कांदा विक्रीतून आलेली रोकड त्यांच्या जवळ होती. त्यांच्यासोबत अन्य दहाजण होते. सर्वजण टेम्पोमधून बेळगावहून लोणंद मार्गे शिरूरकडे जाताना साताऱ्यातील वाढे फाट्यावर चहापाण्यासाठी थांबले.
Mizoram Election: मिझोरममध्ये सत्तांतर, पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या ZPM नं सत्ता मिळवली, एमएनएफचा दारुण पराभव
चहापाण्यासाठी टेम्पोतून उतरल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्याने १८ लाख ९२ हजार ५०० रुपये रोकड असलेली बॅग टेम्पोतच ठेवली. याचवेळी अज्ञात चोरट्याने बॅगेतील रोकडसह मोबाइल, पाकीट, कागदपत्रेही हातोहात लांबविली. चहा पिऊन सर्वजण पुन्हा प्रवासाला निघाले. काही अंतर पुढे गेल्यावर बॅगेत पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले.
वानखेडेवर CM म्हणून शपथ कोण घेणार? बावनकुळेंनी फडणवीसांचं नाव कार्यकर्त्यांकडून वदवून घेतलं
बॅगेतील लाखो रुपयांची रोकड चोरीस गेल्याने शेतकरी आणि त्यांच्या सोबतचे सर्वजण पुन्हा वाढे फाट्यावर आले. चहा पिलेल्या ठिकाणी चाैकशी केली. मात्र, पैसे सापडले नाहीत. यामुळे चोरट्यांनी पाळत ठेवून मोठ्या रकमेवर डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सतीश ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अविनाश माने तपास करीत आहेत.
‘तो येवल्याचा’ जातीयवाद करतो, त्याचे ऐकून जातीयवाद आणि दंगली करु नका, जरांगे पाटलांच्या निशाण्यावर पुन्हा भुजबळ

रस्त्यातून जाताना महिलांनी सेल्फीसाठी विनंती केली, गाडी थांबवत सुप्रिया सुळेंचा आपुलकीने संवाद

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed