• Fri. Nov 15th, 2024

    नाशिक जिल्ह्यात कांदा-बटाटा संघासाठी वाढली चुरस; अर्ज माघारीसाठी १८ डिंसेबरपर्यंत मुदत

    नाशिक जिल्ह्यात कांदा-बटाटा संघासाठी वाढली चुरस; अर्ज माघारीसाठी  १८ डिंसेबरपर्यंत मुदत

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: बिनविरोध निवडणूकीची परंपरा असणाऱ्या कांदा बटाटा संघाच्या निवडणूकीसाठी यंदा मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले होते. सोसायटी गटातून अनेक प्रस्थापितांचे अर्ज छाननीत बाद झाले असले तरीही यातील बहुतेक जणांनी ओबीसी गटातून आपले आवाहन कायम ठेवले आहे. संघाच्या ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उद्या (दि. ४) पासून अर्ज माघारीस सुरुवात होणार आहे. दि. १८ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार असून, अर्ज माघारीनंतरच लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

    या निवडणूकीसाठी इच्छुकांच्या अर्जांची छाननी दोन दिवसांपूर्वी करण्यात आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा खैरनार यांनी अंतिम मतदार यादी जाहीर केली. संस्था सोसायटी गटातून अनेकांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता ‘ओबीसी’गटातून अनेकांनी लढण्याची तयारी केली आहे. या गटातून अद्वय हिरे, अपूर्व हिरे, संदीप गुळवे, राजेंद्र डोखळे, रत्नाकर चुंभळे, आत्माराम कुंभार्डे, भाऊसाहेब ढिकले आदींचे अर्ज आहेत.
    दप्तर दिरंगाई करणं शिक्षणाधिकाऱ्यांना चांगलंच भोवलं; आता भरावा लागणार दंड, काय आहे प्रकरण?
    – १५ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात

    – १५ जागांसाठी एकूण १०५ अर्ज दाखल
    – संस्था, सोसायटी गटातून सर्वाधिक २७ अर्ज बाद
    – ओबीसी गटातएका जागेसाठी सर्वाधिक १८ अर्ज

    गटनिहाय उमेदवार संख्या…

    संस्था, सोसायटी : ७ जागांसाठी ९
    वैयक्तिक सभासद : ३ जागांसाठी ६
    महिला राखीव : २ जागांसाठी ७
    अनुसूचित जाती-जमाती : १ जागेसाठी २
    इतर मागासवर्गीय (ओबीसी) : १ जागेसाठी १८
    विशेष मागासवर्गीय (एनटी) : १ जागेसाठी ६

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed