• Mon. Nov 25th, 2024

    धावत्या कारमधून धूर निघू लागला, काहीच क्षणात गाडीने पेट घेतला, अन् मग… परभणीत थरार

    धावत्या कारमधून धूर निघू लागला, काहीच क्षणात गाडीने पेट घेतला, अन् मग… परभणीत थरार

    परभणी: परभणीत धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवार २ डिसेंबर रोजी सकाळी १० च्या सुमारास वसमत रोडवर घडली. सुदैवाने गाडीमधवील व्यक्ती लवकर बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला, बर्निंग कारच्या बरारामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली.

    सदर घटनेविषयी पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, एम. एच. १५ ई. एक्स. ८१०६ या क्रमांकाची कार चंद्रपुरहून नाशिककडे जात होती. गाडीमध्ये एकूण सहाजण होते. परभणी शहरातील वसमत रोडवरील औद्योगिक वसाहत परिसराच्या गेट क्र. १ समोर कार आल्यावर गाडीमधुन धूर निघत असल्याचे लक्षात आले. वेळीच गाडीतील व्यक्ती बाहेर पडल्या. बघता बघता गाडीने पेट घेतला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरीकांनी अग्निशमनला माहिती दिली.
    कोकण हादरलं; जगण्यासाठी पैसेच नसल्याने आई हतबल, दोन मुलींसह ट्रेन खाली झोकून आयुष्य संपवलं
    नागरिकांनी गाडीची आग विझविण्याचा प्रयत्न केला. शहर वाहतूक शाखेचे पोउपनि, मकसूद पठाण, पोलिस अंमलदार शेख मुश्ताक, प्रल्हाद देशमुख, बालाजी जाधव, मुजीब, अनिल राठोड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक कोंडी सुरळीत केली.

    अग्निशमनचे गौरव देशमुख, अक्षय पांढरे, उमेश कदम, संतोष मुदिराज यांनी नागरिकांच्या मदतीने आग विझविली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. गॅसवर असलेल्या या कारला नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.

    दुबईतून सर्फचं पॅकेट आणलं, अधिकाऱ्यांना शंका, पॅकिंग फाडून सर्फ पाण्यात मिसळलं अन् मग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed