अमोल कोल्हे काय म्हणाले?
मुंबईत सिग्नल्स वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी गाडी अडवून ड्रायव्हरला ऑनलाईन दंड भरण्यास सांगितले. मी स्वतः काय प्रकार आहे याची माहिती घेताना त्या भगिनीने थेट मोबाईलवरील मेसेज दाखवला- प्रत्येक चौकात २५००० रूपयांची वसुली व २० वाहनांवर कारवाई झाली पाहिजे!
मुंबईत ६५२ ट्रॅफिक जंक्शन आहेत. २५,०००×६५२ = १,६३,००,०००/ प्रति दिन म्हणजे फक्त एकट्या मुंबईत तब्बल १.६३ कोटी रुपये.. इतर शहरांचं काय?
संबंधित मंत्रीमहोदयांनी वा अधिकाऱ्यांनी खुलासा केल्यास वाहतूक शाखेचा उपयोग वाहतूक नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याची जनतेला माहिती मिळेल!
ट्रिपल इंजिन.. ट्रिपल वसुली???
खासदार अमोल कोल्हे यांनी वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईवरुन राज्य सरकारवर टीका केली होती.
मुंबई पोलिसांचं प्रत्युत्तर
मुंबई वाहतूक पोलिसांकडून अमोल कोल्हे यांना देखील ट्विटरवरुन प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. महोदय, मुंबई शहरात मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केलेल्या १.३१ कोटींपेक्षा अधिक ई-चालानधील ६८५ कोटी रूपयांपेक्षा अधिक दंडाची रक्कम १ जानेवारी २०१९ पासुन प्रलंबित आहे.
ही दंडनीय रक्कम शासनजमा करण्यासाठी व वाहतुकीच्या नियंमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांमधे वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी शनिवार व रविवार या दिवशी दंड वसुलीची मोहिम हाती घेण्यात येते. अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करणारा संदेश समाजमाध्यमावर प्रसारीत करण्यापुर्वी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी असल्याने पर्यवेक्षिय अधिकाऱ्यांकडुन वस्तुस्थितीची माहिती घेऊन आपण संदेश प्रसारित करणे अपेक्षित होते,
असं मुंबई पोलिसांनी अमोल कोल्हेंना दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.
महोदय, आम्ही चौकशी केली असुन आपले वाहन क्र. MH14 FH – – – – याचेवर दि. २८ डिसेंबर २०१९ ते दि. २ अॅाक्टोबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातिल विविध रस्त्यांवर १५ ई-चलानवरील ₹१६९००/- दंड प्रलंबित असल्यानेच आपले वाहन चालकास थकीत दंड भरण्याची विनंती करण्यात आली होती. https://t.co/QTYsusLuDK pic.twitter.com/V2bAJziSDq
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 2, 2023
अमोल कोल्हेंच्या वाहनाचा दंड प्रलंबित
मुंबई वाहतूक पोलिसांनी आणखी काही ट्विट करत अमोल कोल्हे यांच्या वाहनाचा दंड प्रलंबित असल्याचं म्हटलं. महोदय, आम्ही चौकशी केली असून आपले वाहन क्र. MH14 FH – – – – याचेवर दि. २८ डिसेंबर २०१९ ते दि. २ ऑक्टोबर २०२३ दरम्यान महाराष्ट्रातिल विविध रस्त्यांवर १५ ई-चलानवरील ₹१६९००/- दंड प्रलंबित असल्यानेच आपले वाहन चालकास थकीत दंड भरण्याची विनंती करण्यात आली होती.
यापैकी १२ ई-चलान हे आपल्या वाहनाने विहीत वेगमर्यादेचे पालन न केल्याचे आहेत. याबाबत आपल्या मोबाईल क्रमांकावर सदर वाहनावर ई-चलान जारी केल्याचे संदेश वेळोवेळी पाठविण्यात आले आहेत. तथापि दंडाची रक्कम अद्यापि भरलेली नसल्याने पुढील लिंकवर जाऊन सदर रक्कम शासनजमा करावी ही अपेक्षा
, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News