मयत मुलाचा आणि पत्नीचा मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. मात्र, मयत अश्विनी गायकवाडचे कुटुंबियांनी ”दीपक गायकवाडला आमच्या समोर आणा”, अशी ठाम भूमिका घेतली. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. पोलीस ठाण्यात जमा होऊन त्यांनी आरोपी दीपक याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. तर अश्विनी गायकवाडचा भाऊ विकी मोरे यांनी खुलासा केला आहे की, कशाप्रकारे पैशांसाठी अश्विनीला आणि तिच्या मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी दिली जात होती.
कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात लेन नबंर तीनमध्ये राहणाऱ्या नानूज वर्ल्ड या दुकानाचा मालक दीपक गायकवाड मुलाची आणि पत्नीची हत्या करुन पसार झाला. महात्मा फुले पोलिसांनी संभाजीनगरमधून दीपक गायकवाडला ताब्यात घेतलं. मयत अश्विनी गायकवाड हिचे कुटुंब कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात जमले होते. या ठिकाणी सात वर्षाचा आदिराज आणि त्याची आई अश्विनी हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आलं आहे. कुटुंबियांची एकच मागणी आहे. क्रूर निर्दयी दीपक गायकवाडला आमच्यासमोर आणा. तोपर्यंत अश्विनीचा आणि आदीराजचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
कुटुंबीय आणि स्थानिक नागरिक महात्मा फुले पोलीस ठाण्यात जमा झाले. त्याठिकाणी त्यांनी दीपक गायकवाडला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केली. या वेळी अश्विनीचा भाऊ विकी मोरे यांनी खुलासा केला आहे की, कशा प्रकारे अश्विनीला पैशांसाठी त्रास दिला होता. अश्विनीकडून पैशांची मागणी केली जात होती. आम्ही दीपक गायकवाडला वेळोवेळी पैसे दिले आहे. काही दिवसांपूर्वी पाच लाख रुपये तिला दिले होते. तो हीच धमकी द्यायचा की पैसे दिले नाहीत तर तुझ्यासह तुझ्या मुलाला मारुन टाकणार. अखेर त्याने तेच केलं, असं भाऊ विकी मोरे यांनी यांवेळी सांगितलं.