• Mon. Nov 25th, 2024

    बारामती, रायगड, सातारा आणि शिरूरवर दादांनी दावा सांगितला, जयंतराव म्हणाले, आम्ही तयारच आहे!

    बारामती, रायगड, सातारा आणि शिरूरवर दादांनी दावा सांगितला, जयंतराव म्हणाले, आम्ही तयारच आहे!

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जतमध्ये भाषण करताना आपण लोकसभेच्या ४ जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं. या चारही जागांवर सध्या राष्ट्रवादीचे खासदार आहेत. यामध्ये बारामती, सातारा, शिरूर, रायगड या लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. अजितदादांच्या घोषणेनंतर शरद पवार गटानेही शड्डू ठोकत आम्हीही निवडणुकीसाठी तयार असल्याचं सांगत येत्या लोकसभेत १४ जागा लढवणार असल्याचं सांगत विद्यमान खासदारांच्या जागा लढवू, असं आव्हान दिल्याने येणाऱ्या निवडणकीत काका विरुद्ध पुतण्या संघर्ष संपूर्ण देशाला बघायला मिळेल.

    पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालय येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळाव्यासह आमदारांची बैठक बोलवण्यात आलीये. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचं अधिवेशन रायगड जिल्ह्यातल्या कर्जतमध्ये पार पडलं. येणाऱ्या मार्च महिन्यात लोकसभा निवडणूक लागेल, अशी शक्यता अजितदादांनी बोलून दाखवली. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सावध करताना आपण लोकसभेच्या ४ जागा लढवू, अशी घोषणाही केली. यामध्ये शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेला बारामती लोकसभा मतदारसंघ, शिरूर सातारा आणि रायगड लोकसभा मतदारसंघ लढवू, असा दावाही सांगितला. त्यामुळे शरद पवार गटाच्या आजच्या तातडीने साहजिक यावर चर्चा करून रणनिती ठरविण्यात आली.

    काल दादा तुला असं बोलले आणि तटकरे तसं बोलले.. अजित दादांचं भर सभेतून कार्यकर्त्यांना विशेष आवाहन

    आज पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालय येथे कार्यकर्त्यांची बैठक पार पडत आहे. त्यानंतर आमदारांची बैठक शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. मात्र त्यापूर्वी कार्यकर्त्याना संबोधित करताना शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना लोकसभेच्या १४ ते १५ जागा शरद पवार गट लढवणार आहे, असे वक्तव्य केले. यामध्ये बारामती, शिरूर, सातारा, रायगड लोकसभा मतदारसंघाचा समावेश असेल असं सांगताना सोबतच आणखी १० जागा लढवू, असं जयंतरावांनी सांगून शड्डू ठोकत है तयार हम, असं आव्हानच दिलंय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed