• Sat. Sep 21st, 2024

मोती तलाव बनतोय मृत्यूचा सापळा; तरुण बाजारात जातो सांगून बाहेर पडला, मात्र परतलाच नाही, कुटुंबाचा आक्रोश

मोती तलाव बनतोय मृत्यूचा सापळा; तरुण बाजारात जातो सांगून बाहेर पडला, मात्र परतलाच नाही, कुटुंबाचा आक्रोश

सिंधुदुर्ग: सावंतवाडीतील शहराच्या भोवताली असलेलं मोती तलाव हे मृतदेहांचं हॉटस्पॉट बनत असलेलं पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षापासून मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या किंवा अन्य कारणास्तव मृतदेह आढळून आले आहेत. मात्र यावर कोणतीही नगरपरिषदने किंवा पोलिसांनी उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच प्रत्येक महिन्यामध्ये एक दोन एक दोन असे मृतदेह या तलावामध्ये नेहमीच आढळून आले आहेत. दरम्यान सावंतवाडी येथील तलावात वराड-मालवण येथील तरूणाचा मृतदेह आढळून आला.
आईकडे पैसे मागितले; नकार मिळताच मुलगा संतापला, रागाच्या भरात धक्कादायक कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक अंकुश मेस्त्री (३५) असे त्याचे नाव आहे. तो गेली काही वर्षे कोलगाव येथे राहत होता. दरम्यान फिट आल्यामुळे तो तलावात कोसळला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. तो काल दुपारपासून बेपत्ता होता. दुपारी आपण बाजारात जातो, असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. आज त्याचा मृतदेह तलावात आढळून आला. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार मनोज राऊत यांनी दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार महेश जाधव आणि उपनिरीक्षक श्रीकांत इंगवले करत आहेत.

तरुण मूळ वराड-मालवण येथील आहे. तो कोलगाव येथे गेले काही दिवस स्थायिक झाला होता. गवंडीकाम कामगार असलेला सदर तरुण मोती तलावाच्या काठावर बसलेला असताना तलावात कोसळला असावा असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला होता. काल दुपारपासून तो बेपत्ता होता. दुपारी आपण बाजारात जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. पण रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. दरम्यान काल कोलगावची जत्रा असल्याने तो जत्रेला गेला असावा, असे घरच्यांना वाटले. परंतु रात्री उशिरा देखील तो घरी परतलाच नाही.

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, टोलनाके आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर चर्चा

दरम्यान आज सकाळी सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी मोती तलावात साफसफाईसाठी उतरले असता त्यांना हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला. त्यांनी त्वरित पोलिसांना कळविल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सावंतवाडी पोलीस पुढील तपास करत आहेत. त्याच्या पश्चात, पत्नी, दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed