• Sun. Jun 14th, 2026

    एक-दोन नव्हे तर 238 बंद दरवाजांच्या लोकल मुंबईसाठी! केंद्राकडून 3 हजार कोटींचा आधार; रेल्वे मंत्र्यांची माहिती

    एक-दोन नव्हे तर 238 बंद दरवाजांच्या लोकल मुंबईसाठी! केंद्राकडून 3 हजार कोटींचा आधार; रेल्वे मंत्र्यांची माहिती

    Mumbai Local Trains: सुरक्षित व परवडणाऱ्या रेल्वे प्रवासासाठी केंद्राकडून मुंबई उपनगरीय रेल्वेवर महत्त्वाच्या योजना राबवल्या जात आहेत. यंदा रेल्वेला 3000 कोटींचं वार्षिक अनुदान मिळत असून सध्या 238 स्वयंचलित बंद दरवाज्यांच्या लोकलचं कामही सुरू आहे.

    मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी केंद्राकडून 3,000 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिली. मुंबई लोकलने दररोज70 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असले तरी भाडे दरात दिलेल्या सवलतीमुळे रेल्वेला तोटा सहन करावा लागतो. यामुळे लोकलचे भाडे न वाढवता सेवा सुरू ठेवण्यासाठी हे अनुदान महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच, रेल्वे मार्गासाठी 238 नवीन बंद दरवाजांच्या लोकल ट्रेन बांधण्याचा काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

    रेल्वेची क्षमता वाढणार

    मुंबई उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी गेली अनेक वर्ष नागरिक मागण्या करत आहेत. वारंवार होणारे अपघात, दैनंदिन प्रवासाती गर्दी अशा अनेक समस्यांमुळे प्रवाशांची रखडपट्टी होते. त्यामुळे प्रवास सुरक्षित, वेगवान व आरामदायी करण्यासाठी रेल्वेकडून अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. या प्रकल्पांतर्गत रेल्वेच्या क्षमता वाढीवर भर देण्यात येईल अशी माहिती वैष्णव यांनी यावेळी दिली.Maharashtra TimesMumbai Local: मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वेकडून बंद दरवाजांची लोकल, मध्य रेल्वेवर ‘नॉन-एसी’ ट्रेन लवकरच; एप्रिलमध्ये चाचणी

    सध्या मध्य रेल्वेवर दोन स्वयंचलित बंद दरवाजांच्या लोकल सुरू होणार आहेत. यानंतर लोकलची ही संख्या हळूहळू वाढवण्यात येईल. तसेच, एसी लोकलची संख्याही वाढणार आहे. शिवाय सध्या मुंबई उपनगरीय रेल्वेच्या काही स्थानकांवर फलाट वाढवण्याचे काम सुरू आहे, तसेच, कोचिंग टर्मिनल उभारण्याचही काम सुरू आहे. मुंबई आणि पुण्यासह 48 शहरांतील रेल्वे मार्गांवर ही विकासकामे सुरू आहेत.

    बुलेट ट्रेन प्रकल्पांनाही वेग

    याशिवाय केंद्रीय अर्थसंकल्पात सात बुलेट ट्रेन कॉरिडोरचीही घोषणा झाली होती. यामध्ये मुंबई ते पुणे बुलेट ट्रेनचाही समावेश असून दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ 48 मिनिटांवर येणार आहे. तसेच, पुणे-हैदराबाद रेल्वेमुळे सुमारे दोन तासांत प्रवास होईल.

    Maharashtra TimesMumbai News : नायगाव-दादर लोकल प्रवासात मृत्यूचा स्पष्ट पुरावा नाही, तरी प्रवाशाला भरपाई, कल्याणकारी कायद्यावर हायकोर्टाचा भर

    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं कामही वेगात सुरू आहे. ही देशातील पहिली बुलेट ट्रेन असून सध्या 300 किमी लांब मार्गावर काम सुरू आहे. 168 किमी मार्गावर रूळांचं काम पूर्ण झालं असून, 426 किमी मार्गावर खांबांचे बांधकाम सुरू आहे. नाशिक रोड आणि देवळाली या स्थानकांवर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वाची कामं हाती घेतली आहेत. नवे मार्ग, रोड ओव्हरब्रिज आणि अंडरपास उभारणीचं काम सुरू आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा