• Mon. Nov 25th, 2024
    एकीकडे अवकाळी पावसामुळे हाहाकार, पिकांचे मोठे नुकसान, तर फुलंब्रीत पाणीटंचाई, फळबागा धोक्यात

    म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: फुलंब्री तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील जवळपास ४११ हेक्टरवरील फळबागा धोक्यात आल्या आहेत. या फळबागा कशा जगवाव्या, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

    फुलंब्री तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तालुक्यात २०१२ पेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अत्यल्प पावसामुळे खरिपाची पिके हातची गेली. परतीच्या पावसावर रब्बी हंगामाची भिस्त होती.परतीचा पाऊस पडलाच नाही. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे रब्बी हंगामात केवळ काही अंशीच पेरणी झाली आहे. फुलंब्री तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी नगदी पिकांसोबत फळबागा घेतल्या आहे. फळबागातही तालुका अग्रेसर आहे. तालुक्यात मोसंबी, आंबा, चिकू, सीताफळ, पपई, आवळा, व इतर ही फळधारणा असलेले क्षेत्र आहे. पाच वर्षे वयाच्या आतील काही फळबागा आहे. पाणी नसल्याने फळबागा धोक्यात आल्या आहेत.

    PMGKAY: निवडणुकीआधी केंद्र सरकारचा मोठा दिलासा, ८० कोटी नागरिकांना पुढील पाच वर्ष मोफत धान्य मिळणार
    कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर नियोजन करून करावा, विहीरींची पाणी पातळी खाली गेली आहे. फळबागांना सूक्ष्म ठिबक सिंचनचा वापर करुन पाण्याचे अपव्यय टाळावे. कृषी विभागाकडे ८० टक्के अनुदानावर ठिबक सिंचन उपलब्ध आहे.

    – भारत कासार, तालुका कृषी अधिकारी

    गावाच्या शिवारामध्ये असलेल्या साठवण तलावाची पाणीपातळी खूपच कमी आहे. एका महिन्यापर्यंत तलावात पाणी राहील, तलावात पाणी असल्यास परिसरातील विहिरींमध्ये ही चांगले पाणी असते. पाऊस न पडल्यामुळे विहिरींची पाणी पातळीही कमालीची खालावली आहे. त्यामुळे या वर्षी पाण्याची समस्या निर्माण होऊन फळबाग जगविणे अवघड झाले आहे.

    – बाबासाहेब तांदळे, शेतकरी

    https://maharashtratimes.com/maharashtra/osmanabad/crop-damage-due-to-unseasonal-rains-in-dharashiv/articleshow/105607723.cms

    या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. नदीपात्रात पाणी आले नाही. नदीला पाणी आल्यास शेतीच्या सिंचन क्षेत्रात वाढ होते. फळबागांना मोठा फायदा होतो. परंतु, या वर्षी पाऊसच पडला नाही. त्यामुळे नदीला पाणी आले नाही. नदीला पाणी नसल्यामुळे विहिरीची पाणीपातळी घटली आहे. त्यामुळे फळबागा धोक्यात आहेत.

    – अशोक पांडुरंग जाधव, शेतकरी

    दीड एकर ज्वारी अन् ७५० मोसंबीच्या झाडांना अवकाळीचा फटका; शेतकऱ्याचं १०० टक्के नुकसान

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *