• Mon. Nov 25th, 2024

    तरुणानं वाटेत अडवलं; फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी पिशवीत टाकली, नंतर केलं असं काही की तरुणीनं घेतली पोलिसात धाव

    तरुणानं वाटेत अडवलं; फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी पिशवीत टाकली, नंतर केलं असं काही की तरुणीनं घेतली पोलिसात धाव

    पुणे: ‘मला फोन कर. फोन केला नाही, तर अॅसिड टाकेन’ अशी धमकी देऊन तरुणाने तरुणीजवळील पिशवीत त्याचा मोबाइल क्रमांक लिहिलेली चिठ्ठी टाकली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा हात ओढून विनयभंग केल्याचा प्रकार पुणे स्टेशन येथील पीएमपी बस स्थानकात घडला. या प्रकरणी वडगाव शेरी येथे राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    मुंबईत पोलीस ठाण्यातच ओली पार्टी; व्हिडिओ व्हायरल, चार पोलिसांवर कारवाई
    हा प्रकार २६ नोव्हेंबरला घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तिच्या आईसह वडगाव शेरी येथून शहरात मामाकडे आली होती. तेथून परत जात असताना त्या पुणे स्टेशन परिसरातील पीएमपी स्थानकात पोहोचल्या. त्यावेळी आरोपी तरुणाने तरुणीकडे मोबाइल क्रमांकाची मागणी केली. तरुणीने देण्यास नकार दिला. त्यानंतर तरुणी आईसह बसमध्ये चढत असताना आरोपीने पाठीमागून तिचा हात खेचला. ‘मला पुन्हा भेट’ असे बोलून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले.

    तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा धुरळा, सुप्रिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन मतदानासाठी रांगेत

    त्यानंतर तरुणीकडील पिशवीमध्ये त्याचा मोबाइल नंबर लिहिलेला कागद टाकला. नंतर ‘मला फोन केला नाही, तर तुझ्यावर अॅसिड टाकेन,’ अशी धमकी दिली. दरम्यान याच तरुणाने दोन महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारे तरुणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तरुणाने चिठ्ठीवर लिहून दिलेल्या मोबाइल क्रमांकावरून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed