• Sat. Sep 21st, 2024

बीडमधील जाळपोळीमागं सत्तेतील शक्तिशाली नेत्याचा हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप

बीडमधील जाळपोळीमागं सत्तेतील शक्तिशाली नेत्याचा हात, रोहित पवारांचा गंभीर आरोप

वाशिम : बीड मध्ये झालेल्या जाळपोळीनंतर मी बीड ला स्वतः गेलो होतो. त्याठिकाणी झालेल्या जाळपोळ मागे एका शक्तिशाली व्यक्तीचा हात होता, असा गंभीर आरोप कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला. बीडच्या जाळपोळीमागे सत्तेत असण्याऱ्या व्यक्तीचा हात होता. सात तास जाळपोळ चालू होती पोलीस शांत होते. पोलीस कुणाचा आदेश असल्याशिवाय शांत राहू शकत नाहीत, असंही रोहित पवार म्हणाले. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद निर्माण करुन वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न तिथे झाला, असं रोहित पवार म्हणाले. लोकसभा निवडणूक समोर ठेवून जानेवारीपासून राजकीय पोळी भाजण्यासाठी राज्यातील विविध भागात असा प्रयत्न केला जाऊ शकतो. राजकीय द्वेषातून असा प्रयन्त कोणी करत असेल, प्रोफेशनल गुंडं कोणी आणून असे करेल आणि निघून जाईल हे जनतेने समजून घ्यायला पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.

फडणवीसांना राज्यातील युवा गंभीर आहे असं नाही….. : रोहित पवार

तुम्ही कितीही ताकद लावा,युवा संघर्ष यात्रेदरम्यान रोहित पवारांचं ट्विट,स्क्रीन शॉट शेअर करत म्हणाले…

स्पर्धा परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात शुल्क आकारून राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांची हे सरकार लूट करत आहे. हजार रुपये देण्याची परिस्तिथी मुलांची नाही. सरकार हे लोकांसाठी असते लोकांकडून पैसे वसूल करण्यासाठी नाही.आम्ही हा मुद्दा अधिवेशनात मांडल्यावर फडणवीस यांनी आम्हला उत्तर दिले की आताची पिढी सिरीयस नाही. मात्र, आम्ही ही पदयात्रा करुन या माध्यमातून आम्ही दाखवून देऊ ही की युवा पिढी सिरीयस असून येत्या अधिवेशनात आम्ही परीक्षा शुल्क व सरकारी भरती बाबत मुद्दे लावून धरणार आहोत, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे वाशिम येथे युवा संघर्ष यात्रा निमित्त आले असताना सांगितले.
मुसळधार पावसाने झोडपले; गारपिटीमुळे ९० मेंढ्या व शेकडो बगळे मृत्युमुखी

डिसेंबरअखेरपर्यंत हे सरकार टिकणार नाही: रोहित पवार

हे सरकार संपूर्ण गोंधळलेले असून मुख्यमंत्री आज वेगळं बोलतात उद्या वेगळं बोलतात,असा आरोप रोहित पवार यांनी केला. मंत्र्यां-मंत्र्यांमध्ये वाद आहेत. मंत्र्यांना काय चाललं त्यांनाच कळत नाही, एक मंत्री कॅबिनेटमध्ये न बोलता रस्त्यावर येऊन आक्रमक पणे बोलतात.हे गोंधळलेले निकामी सरकार आहे असे आम्हाला वाटते, अशी टीका रोहित पवार यांनी वाशिममध्ये केली आहे.
दारु सोडण्यावरुन वाद, मेहुण्याचे भाऊजीवर जीवघेणे वार, मरणासन्न अवस्थेत नाल्यात टाकलं अन्…
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed